- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषकात यजमान वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. पुन्हा एकदा आफ्रिकन संघ चोकर ठरणार अशी शक्यताही निर्माण झाली होती. पण, अखेर जानसेनने जोर लावून संघाला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन जानसेन २१ धावांवर नाबाद राहिला. ही खेळी महत्त्वाची ठरली. कारण, तेव्हा आफ्रिकन संघ ५ बाद ९३ वर होता आणि डेव्हिड मिलर बाद झाला होता. त्यानंतर जम बसलेला ख्रिस्टियन स्टब्ज आणि केशव महाराजही बाद झाले. पण, जानसेनने एक बाजू लावून धरत धावा वाढवण्याची भूमिका कायम ठेवली. (T20 World Cup SA vs WI)
या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे सुरुवातीला २० षटकांत १३६ धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेसाठी १७ षटकांत १२४ असं करण्यात आलं. क्विंटन डी कॉक (१२), मार्करम (१८), स्टब्ज (२९) आणि क्लासेन (१८) यांनी आक्रमक सुरुवात करण्याची रणनीती ठेवली होती. पण, त्या नादात त्यांनी विकेटही फेकली. त्यामुळेच आफ्रिकन संघाची अवस्था ७ बाद ११० झाली होती आणि आवश्यक धावगती षटकामागे ९ अशी होती. पण, जानसेननं खंबीरपणा दाखवत संघाची नाव पलीकडे नेली. (T20 World Cup SA vs WI)
What a finish in Antigua 🥵
The Proteas go through to the #T20WorldCup Semi-Finals 🌟#WIvSA 📝 https://t.co/Gv3hNXD6c4 pic.twitter.com/tWbznVDrIk
— ICC (@ICC) June 24, 2024
(हेही वाचा – Drugs Seized : ‘एनसीबी’ने नगरमध्ये रोखली १२५ किलो गांजाची तस्करी; चौघांना अटक)
त्यापूर्वी विंडिज संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद १३५ धावांच करू शकला. तबरेझ शाम्सीने २७ धावांत ३ बळी मिळवत त्यांना रोखलं. काईल मायर्स (३५) आणि रोस्टन चेज (५२) यांनी वेस्ट इंडिजला निदान १२५ धावांचा टप्पा गाठून दिला. नाहीतर त्यांचीही अवस्था ६ बाद ९७ झाली होती. ही लढतच मूळात आफ्रिकन फिरकीपटू विरुद्ध विंडिज फिरकीपटू अशी ठरली. विंडिजकडूनही रोस्टन चेजने ३ तर अलझारी जोसेफ आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. (T20 World Cup SA vs WI)
सुपर ८ मध्ये दुसऱ्या गटातील सामने आता संपले आहेत. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड हे संघ बाद फेरीत पोहोचले आहेत. तर विंडिज आणि अमेरिकेचं आव्हान संपुष्टात आलं आहे. गटात इंग्लिश संघ दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या गटात भारतीय संघ अव्वल राहिला तर या दोघांमध्ये उपांत्य फेरीची लढत होईल. (T20 World Cup SA vs WI)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community