Bajrang Punia : बजरंग पुनियावरील बंदी नाडाने पुन्हा केली लागू

Bajrang Punia : निवड चाचणीदरम्यान बजरंगने उत्तेजक चाचणीसाठी नमुने द्यायला नकार दिला होता.

137
Bajrang Punia : बजरंग पुनियावरील बंदी नाडाने पुन्हा केली लागू
  • ऋजुता लुकतुके

राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य चाचणी प्राधिकरणाने कुस्तीपटू बजरंग पुनियावर (Bajrang Punia) घातलेली बंदी पुन्हा एकदा लागू केली आहे. मध्यंतरी बजरंगने केलेल्या अपिलानंतर ही बंदी तात्पुरती उठवण्यात आली होती. हे प्रकरण १० मार्चला सोनीपत इथं झालेल्या कुस्ती निवड चाचणी दरम्यानचं आहे. ऑलिम्पिकसाठी विविध गटांमध्ये निवड चाचणी सुरू असताना बजरंग पुनियाने लघवीचे नमुने द्यायला नकार दिल्याचं नाडाचं म्हणणं आहे. तर बजरंगने रक्त आणि लघवीचे नमुने गोळा करण्यासाठी जुनी, चुकीची आणि मुदत संपलेली उपकरणं वापरली जात असल्याचा आरोप केला आहे. या कारणामुळेच आपण नमुने दिले नाहीत. उपकरणं बदलली असती तर नमुने देण्यास हरकत नव्हती, असं बजरंगचं म्हणणं आहे. (Bajrang Punia)

२३ एप्रिलला नाडाने सर्वप्रथम बजरंगला तात्पुरतं निलंबित केलं. मुदतीत उत्तेजक चाचणी होत नाही, तोपर्यंत हे निलंबन लागू असणार होतं. जागतिक कुस्ती संघटनेनंही ही कारवाई उचलून धरली होती. पण, या निर्णयाविरोधात अर्थातच, बजरंगने अपील केलं. ही सुनावणी जागतिक शिस्तपालन समितीसमोर झाली. ३१ मेला या समितीने निलंबन हटवलं. आणि नाडाने निलंबनाची नोटीस न बजावल्याचं कारण त्यासाठी दिलं. (Bajrang Punia)

(हेही वाचा – Congress ने लोकशाहीला काळीमा फासला; अधिवेशनापूर्वी PM Modi यांची घणाघाती टीका)

आता नाडाने काटेकोर नोटीस पाठवून बजरंग (Bajrang Punia) वरील निलंबन पुन्हा सुरू करत असल्याचं म्हटलं आहे. ३० मार्चला हरियाणात सोनीपत इथं निवड चाचणी दरम्यान बजरंगची उत्तेजक द्रव्य चाचणी झाली नव्हती. बजरंगने आपल्या अपीलमध्ये म्हटल्याप्रमाणे, ‘चाचणी घेणारे अधिकारी मुदत संपलेली सिरिंज आणि इतर जुनी उपकरणं वापरत होते. मी त्यांना उपकरणं बदलायची विनंती केली. उत्तेजक चाचणी घेण्याला माझा विरोध नव्हता.’ नाडाने आता बंदी पुन्हा लागू केली आहे आणि बजरंगकडे या कारवाई विरोधात अपील करण्यासाठी किंवा आपली बाजू मांडण्यासाठी ११ जुलैपर्यंतची मुदत आहे. (Bajrang Punia)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.