‘ओम् प्रमाणपत्र’ केवळ प्रसाद आणि पूजा साहित्यापुरते मर्यादित नसणार; हिंदूंना सर्वच गोष्टी पवित्र मिळाल्या पाहिजेत; Ranjit Savarkar यांची घोषणा

गोवा येथे श्री रामनाथ देवस्थानात सोमवार, २४ जूनपासून वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचे (Vaishwik Hindu Rashtra Mahotsav) आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन संत महंतांचा उपस्थितीत करण्यात आले. यानंतर आयोजित प्रथम सत्रात रणजित सावरकर बोलत होते.

153
'ओम् प्रमाणपत्र' केवळ प्रसाद आणि पूजा साहित्यापुरते मर्यादित नसणार; हिंदूंना सर्वच गोष्टी पवित्र मिळाल्या पाहिजेत; Ranjit Savarkar यांची घोषणा
आमच्या आस्थेचे रक्षण करण्याची जबाबदारी आमचीच आहे. बौद्ध, पारसी, जैन आणि सनातनी वैदिक हिंदू हे सगळे हिंदू म्हणून एक आहेत, त्यांना एकत्र ठेवायचे असेल, तर आस्था हे एकमेव माध्यम आहे. या आस्थेचा उपयोग करण्यासाठी या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचा वापर झाला पाहिजे. प्रसाद आणि पूजा साहित्य शुद्धीसाठी आम्ही ओम प्रमाणपत्राची मोहीम सुरु केली आहे. हे प्रमाणपत्र आम्ही मुसलमानांना देणार नाही. कारण त्यांची आस्था काय आहे, तर हिंदूंना द्यावयाच्या साहित्य, प्रसादावर थुंकायचे, त्यामध्ये गायीची चरबी घालायची. त्यामुळे त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही. यापुढे हिंदूंना मंदिर बांधायचे असेल, तर त्यासाठी लागणारे लोखंडही पवित्र असले पाहिजे, घरामध्ये हिंदू जे जे पूजा साहित्य वापरतात, ज्या ज्या गोष्टी वापरतात त्या सर्व पवित्र असल्या पाहिजेत. म्हणजे ओम् प्रमाणपत्र हे केवळ प्रसादापुरते सीमित राहणार नाही तर हिंदू ज्या ज्या वस्तू वापरतात त्या सर्वांसाठी ओम् प्रमाणपत्र लागू राहील. जर घरातील एसी, हॉस्पिटल हलाल असेल तर ते यापुढे तेही ओम् प्रमाणपत्राने प्रमाणीतही झालेले असेल, या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवात सहभागी हिंदुत्वनिष्ठ यांनी हे ओम् प्रमाणपत्र जाणून घ्यावे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी केले.

गोवा येथे श्री रामनाथ देवस्थानात सोमवार, २४ जूनपासून वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचे (Vaishwik Hindu Rashtra Mahotsav) आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन संत महंतांचा उपस्थितीत करण्यात आले. यानंतर आयोजित प्रथम सत्रात रणजित सावरकर बोलत होते. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरू डॉ. चारुदत्त पिंगळे, इंदौर येथील श्री स्वामी अखंडानंद जी गुरुकुल आश्रमाचे संस्थापक, महामंडलेश्वर आचार्य स्वामी प्रणवानंद सरस्वती, इंस्टीट्यूट ऑफ एडवांस्ड साइंसेज, अमेरिका येथील डॉ. नीलेश नीलकंठ ओक उपस्थित होते.

५० वर्षांत मुसलमानांचे विविध व्यवसायात आक्रमक 

हिंदूंनी कधी स्वतःची शक्ती जाणलीच नाही आणि शत्रूच्या नेरेटिव्हला फसत गेले. त्यासाठी आपल्याला युद्धशास्त्र नव्याने अभ्यासावे लागणार आहे. आजच्या युद्धात मोठे शस्त्र आहे ते आर्थिक शस्त्र आहे. ५० वर्षांपासून हलालचा विषय सुरु आहे. हलाल प्रमाणित उत्पादने खरेदी करू नका, असे सांगणे ही एक नकारात्मक गोष्ट वाटते. हे खरे आहे. इस्लामसाठी हिंदू हे शत्रू आहेत, आपले देवदेवता त्यांच्यासाठी हराम आहेत. राक्षस आहेत. ही परंपरा आपल्याला खंडित करायची आहे. इस्लाम हा धर्म नाही. इस्लाममध्ये राष्ट्र मानणारा हा राष्ट्रवादी होऊच शकत नाही. कारण इस्लाममध्ये राष्ट्र मानणे अमान्य आहे. इस्लाममध्ये दारुल हरबची कन्सेप्ट आहे. म्हणूनच खरा मुसलमान हा कधीच राष्ट्रवादी होऊ शकत नाही. मागील ५० वर्षांपासून मुसलमानांचे विविध व्यवसायात आक्रमण सुरु आहे. मुसलमानांना जगण्याचा अधिकार आहे, कुणी तो नाकारत नाही, पण ते जर आमच्या धर्मावर आक्रमण करत असतील, लव्ह जिहाद करत असतील, आमच्या धार्मिक श्रद्धा दुखावत असतील, आमची मंदिरे तोडत असतील तर हे आम्हाला अमान्य आहे, असेही रणजित सावरकर (Ranjit Savarkar) म्हणाले.

हलदीराम नेस्तनाबूत झाले पाहिजे 

50 वर्षांपूर्वी हलाल प्रमाणपत्र मांसापुरता मर्यादित होते, ते आता बहुतेक क्षेत्रात लागू करण्यात आले आहे. हलालचे प्रमाणपत्र घेतलेल्या हलदीरामने विरोध झाल्यावर प्रमाणपत्र नाकारले मात्र त्यानंतर मागच्या दाराने हे प्रमाणपत्र घेऊन हलाल उत्पादन विकत आहे, त्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत हलदीराम नेस्तनाबूत झाले पाहिजे असे करायला पाहिजे. म्हणून आम्ही ओम् प्रमाणपत्र सुरु केले आहे. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर फळ-फुले विकणारे मुसलमान आहेत, ते आपल्या देवावर चादर चढवतात, त्यांना पिठाधीश्वर डॉ. अनिकेत शास्त्री यांनी विरोध केला तर त्यांना मारहाण झाली. अमरावती येथे जे पेढे बनवले जातात ते गायीच्या चरबीने बनवलेल्या खव्यातून बनवले जातात आणि त्याचे १०० ग्रॅमची पाकिटे बनवून ती विकायला पाठवली जातात, हे पेढे मंदिरात वाटले जातात. आमच्याकडून धंदा करून मुसलमान पैसे मिळवतात त्यातील १० टक्के मशिदीत पाठवतात, ते मशिदीतील पैसे पुढे दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापरले जातात. अशा प्रकारे गायीच्या चरबीतून बनवलेले पेढे विकून मुसलमान आमची आस्थाच नष्ट करत आहेत., असे रणजित सावरकर (Ranjit Savarkar) म्हणाले.

वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव हिंदूंच्या विश्वासात प्राण फुंकते 

गोवा येथे होत असलेला वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव हिंदूंच्या विश्वासात प्राण फुंकण्याचे कार्य करत असतो. उत्सवात हा उत्साह आहे. या महोत्सवाला आपण महाभारताशी जोडायला हवे. १२ वर्षांचा वनवास आणि १ वर्षाचा अज्ञातवास संपवून पांडवांनी शमीच्या वृक्षातून शस्त्रे उचलली. तो युद्ध पूर्व महोत्सव होता. हा युद्ध पूर्व महोत्सव म्हणजे युद्धाची तयारी असते. आपल्यासमोर १२ अक्षुणी सैन्य आहेत, आपण फक्त ५ आहोत, सोबत श्रीकृष्णही नव्हता. तरीही पांडवांनी शमीच्या वृक्षातून शस्त्रे काढली, मला वाटते आज भारतही पांडवांच्या भूमिकेत आहे. ताहीर राजाचा पराभव होण्याच्या पश्चात आपला देश परकीय आक्रमणाखाली होता. त्याला १२०० वर्षे झाली. १२०० वर्षे आपला वनवास होता. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर ७० वर्षे आपला अज्ञातवास होता. आज या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाला १२ वर्षे झाली आहेत. अशा प्रकारे आजचा दिवस हा शस्त्र धारण करण्याचा दिवस आहे. रामायणात रावणाचा वध झाल्यानंतरच रामराज्याची स्थापना झाली. अशा प्रकारे हिंदू राष्ट्र हे सहज येत नाही, त्यासाठी युद्ध करावे लागणार आहे, त्यासाठी हिंदूंचे संघटन करण्याची आवश्यकता आहे, असे रणजित सावरकर (Ranjit Savarkar) म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.