राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. लोकसभेला राज्यात महायुतीला अपेक्षित असा विजय मिळवता आला नाही, त्यामुळे आता आगामी निवडणुकीत कोणाचा विजय होणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Mahayuti)
सूत्रांच्या मतानुसार सांगायचे झाले तर महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीतील घटक पक्षांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी जागावाटपाबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा झाली आहे. दरम्यान, जागावाटपावर बोलत असताना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार गटातील अर्ध्या लोकांना महायुतीत राहायचं नाही, महायुतीत ते नाराज आहेत,” असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं आहे. (Mahayuti)
(हेही वाचा – …तर पुढच्या पिढीनं जगायचं कसं? ओबीसी-मराठा आरक्षण वादावर Raj Thackeray यांचे परखड भाष्य)
अंबादास दानवे यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आलं आहे. “माझ्या माहितीप्रमाणे अजित दादा गटाची बैठक झाली आहे. त्यातील अर्ध्या लोकांनी महायुती करायला विरोध केला आहे,” असे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे. पुढे ते असेही म्हणाले की, त्यामुळे जागावाटपावर होत असलेल्या कपोल कल्पित तुमच्या बातम्या आहेत. अजून कोणत्याच पक्षाचे काहीही सुरू झालेले नाही. मला असं वाटते अजून कोणत्याच राजकीय पक्षाचे जागावाटप झालेले नाही.” (Mahayuti)
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीतील सुरुवातीच्या चर्चेनुसार भाजपाने सर्वात जास्त जागांवर दावा केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा १५५ जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ६० ते ६५ जागांवर आपले उमेदवार उभे करणार असून तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ५० ते ५५ जागा मिळण्याची शक्यता आहे. (Mahayuti)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community