ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपचा मीडिया सेल कसे कसे अपयशी ठरले याचे भाष्य करणारा व्हिडिओ केला होता. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर भाजपच्या मीडिया प्रभारी श्वेता शालिनी (Shweta Shalini) यांनी भाऊ तोरसेकर (Bhau Torsekar) आणि चेतन दीक्षित यांना कायदेशीर नोटीस बजावली होती.
(हेही वाचा – Lok Sabha Oath Ceremony : ‘या’ नेत्यांनी घेतली मायबोलीतून शपथ)
आदरणीय भाऊ तोरसेकर,@BTorsekar @BhauTorsekar
आपण माझ्या विषयी नुकताच एक व्हिडिओ बनवला. तुमची प्रतिमा एक ज्येष्ठ सुजाण पत्रकार अशी माझ्या मनात आहे आणि एक स्पष्ट वक्ता पत्रकार म्हणून मला आपल्याविषयी प्रचंड आदर आहे . व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही म्हणता तुम्ही मला ओळखत नाही, कधी…
— श्वेता शालिनी- मोदी का परिवार (@shweta_shalini) June 24, 2024
श्वेता शालिनी यांनी स्वतः ट्विट करून भाऊंना कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती दिली होती. त्यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर श्वेता शालिनी यांच्यावर जोरदार टीका झाली. ही टीका झाल्यानंतर आणि या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद उमटल्यानंतर श्वेता शालिनी यांनी आपले ट्वीट डिलीट करत कायदेशीर नोटीस मागे घेतल्याचे दुसरे ट्विट केले आहे.
श्वेता शालिनी यांचे ट्वीट काय आहे…
काही मोजक्या लोकांच्या ऐकण्यावरून कोणतीही शहानिशा न करता माझ्याविषयी व्हिडीओ बनवणे तुमच्यासारख्या वरिष्ठ पत्रकाराकडून अपेक्षित नव्हते. माझी बाजू समजून न घेता तुमच्यासारख्या प्रतिभावंत पत्रकाराने कोणाच्या सांगण्यावरून एकतर्फी व्हिडीओ बनवणे याची मला अपेक्षा नव्हती; याच दुःखातून मी आपणास एक लीगल नोटीस ही पाठवली. आपणाशी माझा कोणताही व्यक्तीगत वाद नाही. त्यामुळे मी आपणस पाठवलेली लीगल नोटीस मागे घेत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community