Congress च्या खासदाराने घेतली ‘मृत’ भाषेत शपथ

सोनीपत (हरियाणा) मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार सतपाल ब्रह्मचारी यांनीही संस्कृत भाषेत शपथ घेतली. भाजप नेत्यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली, त्याचे तर कौतुक झालेच. काँग्रेसच्या (Congress) खासदाराने संस्कृतमधून (Sanskrit) शपथ घेतल्यामुळे त्याची चर्चा चालू आहे.

281
Congress च्या खासदाराने घेतली 'मृत' भाषेत शपथ
Congress च्या खासदाराने घेतली 'मृत' भाषेत शपथ

१८व्या लोकसभेतील खासदारांचा शपथविधी २४ जून रोजी संसद भवनात पार पडला. प्रथम सभागृहात राष्ट्रगीत झाल्यानंतर मागील सभागृहातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पहिली शपथ पंतप्रधान मोदींनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यानंतर त्यांच्या मंत्रीमंडळातील लोकसभा खासदारांनी शपथ घेतली. या वेळी अनेक खासदारांनी राज्यभाषेत शपथ घेतली.

(हेही वाचा – मुंबईत मराठी लोकांसाठी ५० टक्के घरे आरक्षित ठेवा; Anil Parab यांची मागणी)

महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे यांनी मराठीतून शपथ घेतली. प्रथमच संसदेत गेलेल्या खासदार बांसुरी स्वराज यांनी त्यांची आई भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचा वारसा चालवत संस्कृतमधून शपथ घेतली. या वेळी सोनीपत (हरियाणा) मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार सतपाल ब्रह्मचारी यांनीही संस्कृत भाषेत शपथ घेतली. भाजप नेत्यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली, त्याचे तर कौतुक झालेच. काँग्रेसच्या (Congress) खासदाराने संस्कृतमधून (Sanskrit) शपथ घेतल्यामुळे त्याची चर्चा चालू आहे.

काँग्रेसनेच संस्कृतला ठरवले मृत भाषा

दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) आणि राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी संस्कृतला ‘मृत’ भाषा संबोधले होते. २०२२ मध्ये कर्नाटकातील भाजप सरकारने ‘कर्नाटक संस्कृत विश्‍वविद्यालय’ उभारण्यासाठी १०० एकर जागा संमत केली होती. यानंतर काँग्रेस, जिहादी आतंकवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि कर्नाटकातील पुरोगामी यांनी भाजप सरकारच्या या निर्णयाला मोठा विरोध केला होता. त्यामुळेच काँग्रेसने ‘मृत’ ठरवलेल्या आणि वेळोवेळी विरोधाचे राजकारण केलेल्या संस्कृत भाषेत काँग्रेस खासदाराने शपथ घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोण आहेत सतपाल ब्रह्मचारी ?

सोनीपत (Sonipat) लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सतपाल ब्रह्मचारी (Satpal Brahamchari) यांनी २१,८१६ मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या मोहनलाल बडोली यांचा पराभव केला. या निवडणुकीत सतपाल ब्रह्मचारी यांना ५,४८,६८२ मते मिळाली. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी मोहनलाल बडोली यांना ५,२६,८६६ मते मिळाली. काँग्रेस पक्षाने ब्राह्मण मते मिळवण्यासाठी आतापर्यंत हरिद्वारमध्ये राजकारण करणाऱ्या सतपाल ब्रह्मचारी यांना लोकसभा निवडणुकीसाठी सोनीपत लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते. ते मूळचे सोनीपत लोकसभा मतदारसंघातील गंगोलीचे रहिवासी आहेत.

मृत नव्हे, वैज्ञानिक भाषा संस्कृत

संस्कृत ही भाषा मृत नव्हे, तर वैज्ञानिक असल्याचे अनेक संशोधनांतून सिद्ध झाले आहे. २०२० पासून ‘आयआयटी इंदूर’मध्ये संस्कृत भाषेतून प्राचीन भारतीय विज्ञान शिकवले जात आहे. प्राचीन गणिततज्ञ भास्कराचार्य यांच्या ‘लीलावती’ या गणितावरील ग्रंथासह भारतातील अन्य प्राचीन वैज्ञानिक ग्रंथ संस्कृत भाषेत जाणून ते मूळ रूपात समजून घेण्यासाठी ‘आयआयटी इंदूर’ने १५ दिवसांचा विशेष ऑनलाईन ‘कोर्स’ चालू केला आहे. वैज्ञानिक संशोधन संस्थांनी गौरवलेल्या संस्कृतचे महत्त्व काँग्रेसने (Congress) नाकारले असले, तरी काँग्रेसचे खासदार पक्षाच्या द्वेषपूर्ण विचारसरणीच्या विरोधात असल्याचेच दिसून आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.