धक्कादायक! केरळमध्ये लसीकरणासाठी मुसलमानांना ‘फ्रंट लाईन वर्कर’ घोषित!

सौदी सरकारने जगभरातील मुसलमानांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घ्या, प्रमाणपत्र दाखवा आणि खुशाल यात्रेला या, असे म्हटले आहे. त्यामुळे दीड महिन्यात लसीकरण उरकण्यासाठी मुसलमानांची धावपळ सुरु झाली आहे.

197

मतांच्या राजकारणासाठी कोरोनाचाही कसा वापर केला जातोय, याचे धक्कादायक उदाहरण केरळमध्ये समोर आले आहे. सौदीने जगभरातील मुसलमानांना ‘आधी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घ्या, मगच यंदाच्या वर्षी हज यात्रेला या’, असा दम भरला आहे. त्यामुळे आता देशभरातील मुसलमानांची धावपळ सुरु झाली आहे. यावर केरळातील डाव्या पक्षाच्या सरकारला मुसलमानांचा पुळका आला आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन धर्मादाम यांनी चक्क हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुसलमानांना लसीकरणासाठी फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन टाकला.

काय म्हटले आहे केरळच्या परिपत्रकात?

लसीकरणासाठी १८-४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी पहिल्या परिपत्रकात ३२ फ्रंट लाईन वर्करची यादी बनवण्यात आली. आता दुसऱ्या परिपत्रकात ११ घटकांची वाढ करण्यात आली आहे. त्यामध्ये हवामान खाते, मेट्रो रेल्वे, पाणीपुरवठा, रुग्णवाहिका चालक, बँक कर्मचारी, वैद्यकीय प्रतिनिधी, एअर इंडिया, प्रशिक्षणार्थी पोलिस, आदिवासी भागात सामाजिक कार्य करणारे कार्यकतें आणि हज यात्रेकरू ह्यांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देण्यात आला आहे. प्रधान सचिव राजन खोब्रागडे यांनी हे परिपत्रक काढले आहे.

New Project 1 4

हज यात्रेसाठी मुसलमानांना केले फ्रंट लाईन वर्कर! 

१७ जुलै रोजी हज यात्रा आहे. मागील वर्षी कोरोनामुळे सौदी सरकारने यात्रा रद्द केली होती. यंदाच्या वर्षी मात्र सौदी सरकारने जगभरातील मुसलमानांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घ्या, प्रमाणपत्र दाखवा आणि खुशाल यात्रेला या, असे म्हटले आहे. त्यामुळे दीड महिन्यात लसीकरण उरकण्यासाठी मुसलमानांची धावपळ सुरु झाली आहे. मुसलमानांची एकाधिकारशाही चालणाऱ्या केरळमध्ये सरकारने सर्व नियम धाब्यावर बसवून मुसलमानांना हज यात्रेला जाता यावे, म्हणून चक्क त्यांचा फ्रंट लाईन वर्कर म्हणून समावेश करण्यात आला आहे. आता देशातील अन्य राज्यांतही मुसलमान असाच आग्रह धरतील तर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा : झाडे पडण्यामागे वादळे निमित्त, वृक्ष रोपणाची पद्धत चुकीची!)

परदेशात शिकायला जाणारे ८ लाख विद्यार्थी रखडले!

सध्या देशभरात परदेशात शिकायला जाऊ इच्छिणाऱ्या ८ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे हे केंद्र सरकारसमोर प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे केंद्राने सर्व राज्यांना ‘आधी अशा विद्यार्थ्यांचे लसीकरण करून त्यांचा पुढचा मार्ग मोकळा करा,’ असे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक यांच्यासह केरळ राज्यानेही विदेशात शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. परंतु लसींचा पुरवठा अपुरा होत असल्याने अपेक्षित संख्येने या विद्यार्थ्यांचे लसीकरण होत नाही. बऱ्याच ठिकाणी लसींअभावी लसीकरण बंद आहे. यात महाराष्ट्रातील नागपूर, पुण्याचा समावेश आहे, तसे दिल्लीतही विद्यार्थ्यांचे लसीकरण थांबले आहे. असे असताना दुसरीकडे केरळमध्ये मात्र या विद्यार्थ्यांऐवजी हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुसलमानांचे लसीकरण करून मुसलमानांच्या लांगूलचालनाची सीमारेषा ओलांडली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.