- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर लगेचच ६ जुलैपासून भारतीय संघाचा झिंबाब्वे दौरा (India Tour of Zimbabwe) सुरू होणार आहे. आणि भारतीय संघ या दौऱ्यात टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची निवड सोमवारी जाहीर करण्यात आली आहे. आणि रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव या ज्येष्ठ फलंदाजांना विश्रांती देण्यात आली आहे. तर रवी जाडेजा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याही झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार नाहीएत. (India Tour of Zimbabwe)
भारतीय संघाला ऑगस्टपासून भरगच्च क्रिकेट कार्यक्रमाला सामोरं जायचं आहे. त्यामुळे प्रमुख खेळाडूंना ही विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत शुभमन गिल (Shubman Gill) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. यंदाची आयपीएल गाजवलेले काही खेळाडू या संघात असतील.
(हेही वाचा – Lok Sabha Speaker: एनडीए लोकसभा अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार, जाणून घ्या कोणाच्या नावाची चर्चा?)
रियान पराग, अभिषेक शर्मा आणि नितिश कुमार यांना संघात स्थान मिळालंय. तर संजू सॅमसन आणि यशस्वी जयसवाल जे टी-२० विश्वचषक खेळले पण, त्यांना अंतिम अकरा जणांत स्थान मिळालं नाही, असे खेळाडूही झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार आहेत. (India Tour of Zimbabwe)
Squad: Ꮪhubman Gill (Captain), Yashasvi Jaiswal, Ruturaj Gaikwad, Abhishek Sharma, Rinku Singh, Sanju Samson (WK), Dhruv Jurel (WK), Nitish Reddy, Riyan Parag, Washington Sundar, Ravi Bishnoi, Avesh Khan, Khaleel Ahmed, Mukesh Kumar, Tushar Deshpande.#TeamIndia | #ZIMvIND
— BCCI (@BCCI) June 24, 2024
(हेही वाचा – Pune Crime: रील्स बनवण्यासाठी अल्पवयीन मुलांचा अजीब कारनामा; लोकांचे केले मोठ्या प्रमाणात नुकसान)
मुख्य गोलंदाजही रजा घेणार असल्यामुळे आवेश खान, खलिल अहमद यांच्याबरोबर तुषार देशपांडेचीही भारतीय संघात निवड झाली आहे. तर रिंकू सिंगही या १५ जणांच्या संघात आहे. भारताचा टी-२० दौरा ६ जुलैला सुरू होईल. त्यानंतर ७, १०, १३ आणि १४ तारखांना पुढील सामने खेळवले जातील. अभिषेक, रियान पराग आणि तुषार देशपांडे यांची पहिल्यांदाच भारतीय संघात वर्णी लागली आहे.
झिंबाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ,
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन, रिंकू सिंग, रियान पराग, अभिषेक शर्मा, नितिश कुमार, ऋतुराज गायकवाड, ध्रुव जुरेल, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, आवेश खान, खलिल अहमद व तुषार देशपांडे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community