भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (sunita williams) आणि बुच विल्मोर (Butch Wilmore) यांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतणे पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. हे दोन्ही अंतराळवीर गेल्या १२ दिवसांपासून अंतराळात अडकून पडले आहेत. सुनीता आणि विल्मोर ६ जून रोजी स्पेस स्टेशनवर पोहोचले. ते १३ जूनला परतणार होते. (sunita williams)
हेलियम गळती
मात्र, नासाच्या बोईंग स्टारलाइनर अंतराळयानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचे परतणे सलग चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आले आहे. लँडिंग 18 जूनपर्यंत ढकलले जात असल्याचे सांगून पहिली घोषणा 9 जून रोजी करण्यात आली. दोघांनाही कोणताही धोका नसल्याचे नासाने म्हटले आहे. ते ज्या अंतराळयानात परतणार होते, त्यात हेलियम गळती होत आहे. त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अंतराळयानाची क्षमता ४५ दिवस असून १८ दिवस झाले आहेत. (sunita williams)
यानंतर माघारीची मुदत 22 जूनपर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर, परतीची तारीख बदलून 26 जून करण्यात आली. आता नासाने म्हटले आहे की, दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर परतण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. मात्र, त्यांच्या परतीची कोणतीही नवीन तारीख देण्यात आलेली नाही. (sunita williams)
रिॲक्शन कंट्रोल थ्रस्टरमध्ये अडचण
बुधवार, 5 जून रोजी रात्री 8:22 वाजता बोइंगचे स्टारलाइनर मिशन लॉन्च झाले. फ्लोरिडामधील केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून यूएलएच्या ॲटलस व्ही रॉकेटवर हे प्रक्षेपित करण्यात आले. अंतराळयान दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ जून रोजी रात्री ११:०३ वाजता ISS वर पोहोचले. रात्री ९.४५ वाजता पोहोचणार होते, पण रिॲक्शन कंट्रोल थ्रस्टरमध्ये अडचण आली. (sunita williams)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community