Ashok Leyland : प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या 100 बसगाड्या अशोक लेलँडच्या सर्व्हीस सेंटरमध्ये जमा

195
Ashok Leyland : प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या 100 बसगाड्या अशोक लेलँडच्या सर्व्हीस सेंटरमध्ये जमा
Ashok Leyland : प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या 100 बसगाड्या अशोक लेलँडच्या सर्व्हीस सेंटरमध्ये जमा

सदोष बसगाड्यांची विक्री केल्यानंतरही त्यांची दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष करणे; बस खरेदीदारांच्या समस्या ऐकून न घेणे यामुळे संतप्त झालेल्या मुंबई बस मालक संघटना आणि बस ओनर सेवा संघर्ष समितीचे सदस्य आक्रमक झाले आहेत. या बस मालकांनी नायगावनजीकच्या सर्व्हीस सेंटरवर जाऊन आपल्या 100 हून अधिक बसगाड्या जमा केल्या. विशेष म्हणजे, या बसगाड्या जमा केल्यानंतरही अशोक लेलँडकडून (Ashok Leyland) प्रतिसाद न मिळाल्याने वाहनधारकांनी भरपावसात धरणे आंदोलन केले.

(हेही वाचा – T20 World Cup, Ind bt Aus : भारताचा ऑस्ट्रेलियावर २४ धावांनी दिमाखदार विजय, रोहित शर्माच्या ४१ चेंडूंत ९२ धावा)

खासगी वाहतूकदारांनी सुमारे एक कोटी रूपये खर्च करून अशोक लेलँडने (Ashok Leyland) बाजारात आणलेल्या 13. 5 मीटर लांबीच्या बसगाड्या विकत घेतल्या आहेत. मात्र, या बसगाड्या सदोष असल्याने प्रवासादरम्यान अपघातग्रस्त होण्याचा धोका बळावला आहे. या संदर्भात मुंबई बस मालक संघटनेने 13 जून रोजी ठाण्यातील अशोक लेलँड (Ashok Leyland) कंपनीच्या प्रशासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली होती. मात्र, व्यवस्थापनाने त्यांच्या या विनंतीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतरही अनेक बसगाड्यांचे फ्रंट व्हील हब क्रॅक होणे, व्हील डिस्क तुटणे, क्लच- प्रेशर प्लेट, रिलीझ बेरिंग, क्लच सिलेंडर, डिझेल पाईप तुटणे, सायलेन्सर पाईप फुटणे , पुरवठा करणे करणारे पाईप फुटणे, गियर बॉक्स – ब्रेक लायनर तुटणे या समस्या सुरूच होत्या. विशेष म्हणजे अवघ्या काही महिन्यातच या समस्या निर्माण झाल्या असून अशोक लेलँडकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा किंवा वाॅरंटी प्रदान केली जात नाही. त्यामुळे हताश झालेल्या सुमारे 100 बस मालकांनी आज थेट सर्व्हीस सेंटर गाठून आपल्या बसगाड्या परत केल्या.

दरम्यान, या बसगाड्या परत केल्यानंतरही व्यवस्थापनाकडून साधी विचारणाही केली नाही. किंवा व्यवस्थापनातील एकही अधिकारी बसमालकांची भेट घेण्यास न आल्याने संतप्त झालेल्या बसमालकांनी तेथील चिखलातच बसून धरणे आंदोलन केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.