‘अंतराळातला बटाटा’ सूर्यमालेतील या ग्रहाला धडकणार; NASA ची माहिती

177
'अंतराळातला बटाटा' सूर्यमालेतील या ग्रहाला धडकणार; NASA ची माहिती
'अंतराळातला बटाटा' सूर्यमालेतील या ग्रहाला धडकणार; NASA ची माहिती

अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘नासा’ (NASA) ही जगातील अग्रगण्य अवकाश संशोधन संस्था आहे. ‘नासा’कडून वेळोवेळी अंतराळातील वेगवेगळे फोटो आणि रंजक माहिती शेअर केली जाते. असाच एक फोटो सध्या चर्चेत आहे. नासाने शेअर केलेला हा फोटो मंगळाच्या (mars) चंद्राचा आहे. या चंद्राचं नाव फोबोस (Phobos) असं आहे. (NASA)

(हेही वाचा –Ashok Leyland : प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या 100 बसगाड्या अशोक लेलँडच्या सर्व्हीस सेंटरमध्ये जमा)

फोबोस हा मंगळाच्या दोन चंद्रांपैकी मोठा चंद्र आहे. मात्र पृथ्वीच्या चंद्राच्या तुलनेत तो फारच छोटा आहे.मंगळाला दोन चंद्र असून दुसऱ्याचं नाव डिमोस (Demos) असं आहे. डिमोस हा फारच ओबडधोबड असून फोबोसप्रमाणे तो गोलाकार आकारच्या आसपासही नाही. मंगळाचा सर्वात मोठा चंद्र असलेला फोबोस अगदी छोट्या आकाराच्या बटाट्यासारखा दिसतो म्हणून त्याला ‘अंतराळातील बटाटा’ म्हणजेच स्पेस पोटॅटो असंही म्हटलं जातं. (NASA)

फोबोस मंगळावर आदळणार

नासाने दिलेल्या माहितीनुसार, फोबोस हा आकाराने फार लहान असल्याने त्याच्या पृष्ठभागाला स्वत:कडे खेचण्याइतकं गुरुत्वाकर्षणही त्याच्याकडे नाही. नासाने दिलेल्या माहितीनुसार, फोबोस हा काही काळाने मंगळावर आदळणार आहे. दर 100 वर्षांमध्ये फोबोस मंगळाच्या 6 फूट जवळ येत आहे. असं सुरु राहिलं तर 5 कोटी वर्षात फोबोस मंगळावर आदळेल किंवा त्याचा स्फोट होऊन त्यापासून मंगळाभोवती रिंग तयार होईल. (NASA)

फोबोसचा आकार बटाट्यासारखा 

म्हणजेच आपल्या पृथ्वी आणि चंद्रामध्ये गुरुत्वाकर्षणामुळे एकमेकांमध्ये असणारं संतुलन फोबोस आणि मंगळात नाही. असा प्रकार डिमोससंदर्भातही आहे. त्यामुळेच फोबोसचा आकार हा वर्तुळाकार नसून ओबडधोबड म्हणजेच बटाट्यासारखा असल्याचं नासाने सांगितलं आहे. या चंद्रावर बसेच खड्डे आणि विवरं दिसत असल्याचंही नासाने म्हटलं आहे. (NASA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.