-
ऋजुता लुकतुके
या विश्वचषकातील (T20 World Cup) सगळ्यात रोमहर्षक सामना हा सुपर ८ चा शेवटचा सामना ठरला. बांगलादेश आणि अफगाणिस्तान (Afg bt Ban) दरम्यानचा हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. आणि पारडं दोन्हीकडे अधून मधून झुकत राहिलं. अखेर पावसाने ४ वेळा व्यत्यय आणलेला हा सामना अफगाणिस्तानने ८ धावांनी जिंकला. या कामगिरीमुळे अफगाणिस्तानने पहिल्यांदाच आयसीसी आयोजित स्पर्धेत उपान्त्य फेरी गाठली आहे. तर दुसरीकडे टीव्हीवर हा सामना पाहणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला आता रिकाम्या हाताने परतावं लागणार आहे.
अफगाणिस्तानचा संघ धावांचा पाठलाग करताना कोलमडतो म्हणून असेल राशिद खानने (Rashid Khan) नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली. आणि हा निर्णय चांगलाच फसला. ढगाळ आणि पावसाळी वातावरणात खेळपट्टीकडून गोलंदाजांना चांगली साथ मिळत होती. आणि अफगाणिस्तानचा संघ २० षटकांत ५ बाद ११५ धावाच करू शकला. पण, खरी रंगत बांगलादेशच्या डावात आली. (Afg bt Ban)
(हेही वाचा – Pune Crime: रील्स बनवण्यासाठी अल्पवयीन मुलांचा अजीब कारनामा; लोकांचे केले मोठ्या प्रमाणात नुकसान)
GOING TO THE SEMI-FINALS 🤯
Afghanistan defeat Bangladesh in a thriller 📲https://t.co/Jpe4CazJFY#T20WorldCup #AFGvBAN pic.twitter.com/3GLYcoXWtk
— ICC (@ICC) June 25, 2024
अगदी सौम्या सरकार आणि तौहिद ह्रदय खेळपट्टीवर असेपर्यंत बांगलादेशचं पारडं जड होतं. सामना खऱ्या अर्थाने राशिद खानने (Rashid Khan) पलटवला. त्याने ४ षटकांत २३ धावा देत ४ बळी मिळवले. तर गुलबदिनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्या प्रमाणे इथंही गरज असताना बळी टिपला. त्याने तनझीमला बाद करत बांगलादेशचे गोलंदाज खेळपट्टीवर आणले. दुसऱ्या बाजूने लिट्टन दास ५४ धावा करत प्रयत्न करत होता. पण, अफगाण गोलंदाज एका उद्दिष्टाने खेळत होते. नवीन उल हकने १७ व्या षटकांत लागोपाठ दोन बळी मिळवत हा सामना अफगाणिस्तानला जिंकून दिला. (T20 World Cup)
आता उपान्त्य फेरीत अफगाणिस्तानची गाठ दक्षिण आफ्रिकेशी पडणार आहे. तर भारताचा मुकाबला इंग्लंडशी होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community