भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी सकाळी आकाशवाणीवर देशवासीयांना संबोधित करत त्यांनी देशात आणीबाणी (Emergency) लागू केल्याची घोषणा केली होती. आज या घटनेला जवळपास ४९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने पतंप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक्सद्वारे पोस्ट केली आहे. तसंच, १८ व्या लोकसभेच्या पहिल्या संसदीय अधिवेशनातही त्यांनी या आणीबाणीचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला होता.
“आणीबाणीचा प्रतिकार करणाऱ्या सर्व महापुरुषांना आणि स्त्रियांना आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस”
“आणीबाणीचा (Emergency) प्रतिकार करणाऱ्या सर्व महापुरुषांना आणि स्त्रियांना आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस आहे. #DarkDaysOfEmergency आम्हाला स्मरण करून देते की, काँग्रेस (Congress) पक्षाने मूलभूत स्वातंत्र्य आणि भारताचे संविधान पायदळी तुडवले होते. केवळ सत्तेला चिकटून राहण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने प्रत्येक लोकशाही तत्त्वाचा अवमान करून देशाला तुरुंगात टाकले होते.” असं मोदी म्हणाले. (Emergency)
(हेही वाचा –sunita williams अंतराळात अडकल्या; अंतराळयानातील बिघाडामुळे नासाने चौथ्यांदा परतणे पुढे ढकलले)
Today is a day to pay homage to all those great men and women who resisted the Emergency.
The #DarkDaysOfEmergency remind us of how the Congress Party subverted basic freedoms and trampled over the Constitution of India which every Indian respects greatly.
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2024
ते पुढे म्हणाले, “काँग्रेसशी असहमत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा छळ करण्यात आला. दुर्बल घटकांना लक्ष्य करण्यासाठी सामाजिक प्रतिगामी धोरणे आणली गेली. ज्यांनी आणीबाणी लादली त्यांना आपल्या राज्यघटनेवर प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार नाही. हे तेच लोक आहेत ज्यांनी असंख्य वेळा कलम ३५६ लादले, माध्यम स्वातंत्र्य नष्ट करणारे विधेयक आणले, संघराज्य नष्ट केले आणि संविधानाच्या प्रत्येक पैलूचे उल्लंघन केले. आणीबाणी लादण्याची मानसिकता आजही त्या पक्षात जिवंत आहे. त्यांनी राज्यघटनेशी केलेली प्रतारणा सर्व प्रकारे लपवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच त्यांना वारंवार नाकारले आहे.” असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीकास्र डागलं आहे. (Emergency)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community