पुणे हे देखील उत्तम पर्यटन स्थळ आहे. पुण्यात पाहण्यासारखे अनेक ठिकाण आहेत. इथली मंदिरे देखील उत्कृष्ट आहेत. यामध्ये आता स्वामी नारायण मंदिराची भर पडली आहे. हे मंदिरा भगवान श्रीस्वामीनारायण यांना समर्पित असलेले असून मंदिराचे सौंदर्य विलक्षण आहे. हे मंदिर फेब्रुवारी २०१७ मध्ये बांधून पूर्ण झाले व सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. (Swaminarayan Temple Pune)
स्थळ :
मंदिराच्या सभोवतालचा हिरवागार परिसर भाविकांना मोहित करतो. हे मंदिर ११-बी१, मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग ४, नर्हे आंबेगाव रोड, नर्हे, पुणे, महाराष्ट्र – ४११०४१ येथे स्थित आहे. (Swaminarayan Temple Pune)
मंदिराची वेळ :
सोमवार ते रविवार :
सकाळी ७ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ४ ते रात्री ८.३०.
आरतीची वेळ :
मंगला आरती : सकाळी ६ वा.
शांगर आरती : सकाळी ७.३० वा.
राजभो आरती : सकाळी ११:१५.
संध्या आरती : सायंकाळी ७:०० वा.
शयन आरती : रात्री ८.३० वा.
वास्तुकला :
मंदिराचे क्षेत्रफळ सुमारे ३३,००० चौरस फूट परिसरात पसरलेले आहे आणि ७४ फूट उंच आहे. मंदिराची रचना रचना आकर्षक आहे. वरून पाहिल्यास हे मंदिर ३-डी पझलसारखे दिसते. संपूर्ण मंदिर दगडांनी कोरलेले आहे आणि बनवताना कोणत्याही स्टीलचा वापर केलेला नाही. मंदिरात गुलाबी सँडस्टोन आणि लाल दगड वापरलेले दिसतात. (Swaminarayan Temple Pune)
१०९ तोरणे आहेत आणि १४० कोरीव खांबांनी श्रीस्वामीनारायण मंदिराचा पाया रचला असून यामुळे मंदिराची शोभा वाढते. मंदिराच्या भिंती आणि खांबांवर १०,००० हून अधिक कोरीवकाम आहेत, जे भारतीय आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचे प्रतीक आहेत. (Swaminarayan Temple Pune)
(हेही वाचा – ‘अंतराळातला बटाटा’ सूर्यमालेतील या ग्रहाला धडकणार; NASA ची माहिती)
अभिषेक मंडपम :
मंदिराचा हा भाग ‘अभिषेक’ अशा पवित्र विधींसाठी राखीव आहे. भाविक भक्ती आणि श्रद्धेने ‘अभिषेक’ विधीत सहभागी होतात. अभिषेक केल्याने भगवान स्वामीनारायण प्रसन्न होतात आणि आंतरिक इच्छा पूर्ण होतात. (Swaminarayan Temple Pune)
अभिषेक मंडपमची वेळ :
सकाळी : ७ ते १२
संध्याकाळी : ४ ते ८ पर्यंत
गिफ्ट शॉप :
या दुकानात तुम्हाला हिंदू धर्मांतील पुस्तके मिळतील. तसेच भजन, कीर्तन आणि ध्यान संबंधित सीडी व पेनड्राइव्ह उपलब्ध होतील. त्याचबरोबर आयुर्वेदिक उत्पादने सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. (Swaminarayan Temple Pune)
गिफ्ट शॉपची वेळ :
सकाळी ९ ते रात्री ८.३०
मंदिरात जाताना घ्यावयाची काळजी :
- मंदिराच्या पावित्र्याचा आदर करा. तोकडे कपडे घालून प्रवेश करु नका.
- आरतीच्या वेळी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र बसण्याची जागा आहे.
- लहान पिशव्या घेऊन जाण्यास परवानगी असली तरी मंदिरात सामान घेऊन जाऊ नका.
- मंदिराच्या आवारात बाहेरील अन्न किंवा मद्य किंवा तंबाखू सेवनाला परवानगी नाही.
- मंदिराच्या आवारात च्युइंगम खाऊन देखील प्रवेश करु नका.
- मंदिरात शांतता पाळा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community