लोकसभा निवडणुकीत निवडून गेलेले राज्यातील बहुतांश खासदारांनी मराठी भाषेतून शपथ घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी घेतलेल्या शपथेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेण्यामागे काय कारण आहे? (Marathi)
चर्चा सर्वत्र रंगली
दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदासंघामध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या निलेश लंके यांना आव्हान दिलं आणि त्याची चर्चा सर्वत्र रंगली. मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी निलेश लंके यांनी पाठ करून जरी बोलली तरी मी निवडणूक अर्ज भरणार नाही, असं जाहीर आव्हान सुजय विखे पाटलांनी दिले होते. (Marathi)
(हेही वाचा – Emergency : आणीबाणीवरून पंतप्रधान मोदींची एक्स पोस्ट; काँग्रेसवर टीका करत म्हणाले…)
इंग्रजीतील पाठ करून बोलून दाखवावं
अहमदनगर शहरातील कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखे संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवला. याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंकेंनी इंग्रजी बोलण्याचं आव्हान दिलं. महिनाभरात जरी त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं असं सुजय विखेंनी म्हटले आहे. (Marathi)
अखेर सुजय यांचा निवडणूकीत पराभव झाला आणि मंगळवारी लंके यांनी अठराव्या लोकसभेत खासदारकीची शपथ इंग्रजीतून घेत सुजय विखे यांना उत्तर दिले. (Marathi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community