- ऋजुता लुकतुके
इगॉर स्टिमॅक यांची भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून मुदत वाढवली नाही, ते बरंच झालं अशी भावना भारतीय फुटबॉल फेडरेशनची झाली आहे. फुटबॉल संघ आशिया स्तरावरील फिफा पात्रता स्पर्धेत अपयशी ठरल्यावर फुटबॉल फेडरेशनने स्टिमॅक यांना डच्चू दिला. पण, मायदेशी परतल्यावर स्टिमॅक भारतीय फुटबॉलची बदनामी करत असल्याचा गंभीर आरोप भारताने केला आहे. (Indian Football News)
‘स्टिमॅक यांनी पाच वर्षांच्या कारकीर्दीत पराभवांसाठी फक्त कारणं दिली. महत्त्वाचे पराभव हेच त्यांच्या कारकीर्दीचं वैशिष्ट्यं ठरलं. असं असताना आता परदेशात जाऊन भारताने त्यांना आवश्यक ती साधनं दिली नाही असा अपप्रचार ते करत आहेत. आणि हे निखालस खोटं आहे,’ असं भारतीय फुटबॉल असोसिएशनने म्हटलं आहे. (Indian Football News)
(हेही वाचा – ‘अंतराळातला बटाटा’ सूर्यमालेतील या ग्रहाला धडकणार; NASA ची माहिती)
भारताची बदनमी आणि अपप्रचाराचा आरोप
स्टिमॅक यांची गच्छंती झाल्यानंतर चारच दिवसांत त्यांनी युरोपातील आपल्या घरी एक पत्रकार परिषद घेतली. यात आपल्याला पुरेसं स्वातंत्र्य आणि साधनं दिली गेली नाहीत, असा आरोप भारतावर त्यांनी केला होता. त्या परिषदेतील त्यांच्या वक्तव्याचा आता फुटबॉल फेडरेशनने परामर्श घेतला आहे. फेडरेशनने एक पत्रक काढूनच स्टिमॅक यांचा समाचार घेतला. आणि त्यांच्यावर भारताची बदनमी आणि अपप्रचाराचा आरोप केला आहे. (Indian Football News)
‘स्टिमॅक यांना खेळाडू निवडीचं, सामन्यांच्या जागा निवडीचं आणि सपोर्ट स्टाफ निवडीचं पूर्ण स्वातंत्र देण्यात आलं होतं. त्यांच्या विनंतीवरून काही वेळा आम्ही सपोर्ट स्टाफ बदललाही,’ असं फुटबॉल फेडरेशनने म्हटलं आहे. ५६ वर्षीय स्टिमॅक हे क्रोएशियाच्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य आहेत. पाच वर्षांपूर्वी भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. सुरुवातीची दोन वर्षं भारतीय संघाची कामगिरी चांगली होती आणि संघाने दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या. त्यानंतर मात्र भारतीय संघाची फिफा क्रमवारी घसरत गेली. (Indian Football News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community