- ऋजुता लुकतुके
युवा इंग्लिश फिरकीपटू शोएब बशिरने (Shoaib Bashir) सोमवारी काऊंटी अजिंक्यपद स्पर्धेत एक विसरण्याजोगं षटक टाकलं. या सरे विरुद्ध वूस्टरशायर सामन्यात त्याने एका षटकांत तब्बल ३८ धावा दिल्या. डॅन लॉरेनने या षटकांत बशिरला लागोपाठ पाच षटकार ठोकले. लॉरेनने आपलं शतकही या दरम्यान पूर्ण केलं. लॉरेन्सने षटकातील पहिल्या ५ चेंडूंवर उत्तुंग षटकार लगावले. त्यातच बशिरने वाईडचे ४ आणि नोबॉलच्या २ धावाही बहाल केल्या. हे षटक खालील व्हिडिओत तुम्ही पाहू शकता. (Shoaib Bashir)
DAN LAWRENCE HAS JUST TAKEN 38 OFF AN OVER pic.twitter.com/QCzsWNaRUI
— Vitality County Championship (@CountyChamp) June 24, 2024
(हेही वाचा – Shambhuraj Desai : पालखी सोहळा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे)
लॉरेन्सने पहिला षटकार पुढे सरसावत मिड ऑफला लगावला. त्यानंतर त्याने तीन फटके एकसारखे जागेवर उभे राहून खेळले. तर पाचवा षटकार मारताना त्याने स्लॉग-स्विपचा फटका खेळला. या पाच आघातांनंतर अर्थातच बशिरच्या (Shoaib Bashir) मनोधैर्यावर परिणाम झाला. पुढचा चेंडू तो फलंदाजापासून थोडा दूर खेळायला गेला. पण, तो लेग साईडला इतका दूर गेला की, यष्टीरक्षकही तो पकडू शकला नाही. आणि ४ वाईडच्या धावा प्रतिस्पर्ध्यांना मिळाल्या. पुढचा चेंडू नोबॉल गेला. काऊंटीच्या नियमानुसार, नोबॉलला २ धावा मिळतात. अखेर पुढच्या चेंडूवर बशिरने हे षटक पूर्ण केलं. या चेंडूवर लॉरेन्सने एकेरी धाव घेतली. बशिरने एकूण ३८ धावा दिल्या. पण, लॉरेन्सचा षटकांत ६ षटकार खेचण्याचा विक्रम हुकला. (Shoaib Bashir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community