१८ व्या लोकसभेचा (18th Lok Sabha) कार्यकाळ सुरु होत असताना संसदेच्या अधिवेशनापूर्वी सभागृहाचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली. मागील २ दिवसांत महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी संसदेत शपथ (Oath in Parliament 2024) घेतली. यातील बहुसंख्य खासदारांनी मातृभाषा मराठीत शपथ घेतली तर काही खासदारांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेत शपथ घेतली. (Lok Sabha Election Oath)
राज्यातील ४८ खासदारांपैकी ३६ खासदारांनी मराठी भाषेत संसदेत शपथ घेतली. तर ९ खासदारांनी हिंदी भाषेत आणि ३ खासदारांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली. (Lok Sabha Election Oath)
भाजपा
छत्रपती उदयनराजे भोसले, सातारा – मराठी
मुरलीधर मोहोळ, पुणे – मराठी
रक्षा खडसे, रावेर – मराठी
स्मिता वाघ, जळगाव – मराठी
नारायण राणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग – हिंदी
अनुप धोत्रे, अकोला – हिंदी
पीयूष गोयल, उत्तर मुंबई – हिंदी
नितीन गडकरी, नागपूर – हिंदी
हेमंत सावरा, पालघर – इंग्रज
(हेही वाचा – PCB in Action Mode : पाकिस्तान क्रिकेट संघासाठी आता असणार आचारसंहिता)
काँग्रेस
शोभा बच्छाव, धुळे – मराठी
बळवंत वानखेडे, अमरावती – मराठी
प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर – मराठी
कल्याण काळे, जालना – मराठी
वसंत चव्हाण, नांदेड – मराठी
वर्षा गायकवाड, मुंबई उत्तर मध्य – मराठी
शिवाजी कालगे, लातूर – मराठी
छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर – मराठी
प्रणिती शिंदे, सोलापूर – हिंदी
गोवाल पाडवी, नंदूरबार – हिंदी
श्यामकुमार बर्वे, रामटेक – हिंदी
प्रशांत पडोले, भंडारा-गोंदिया – हिंदी
किरसान नामदेव, गडचिरोली-चिमूर – इंग्रजी
उबाठा गट
संजय देशमुख, यवतमाळ वाशिम – मराठी
नागेश पाटील आष्टीकर, हिंगोली – मराठी
संजय जाधव, परभणी – मराठी
राजाभाऊ वाजे, नाशिक – मराठी
संजय दिना पाटील, ईशान्य मुंबई – मराठी
अनिल देसाई, दक्षिण मध्य मुंबई – मराठी
अरविंद सावंत, दक्षिण मुंबई – मराठी
भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी – मराठी
ओमराजे निंबाळकर, धाराशिव – मराठी
(हेही वाचा – Jamshedpur Womens College: जमशेदपूर महिला महाविद्यालयाची ‘ही’ वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहेत का?)
राष्ट्रवादी शरद पवार गट
अमर काळे, वर्धा – मराठी
भास्कर भगरे, दिंडोरी – मराठी
सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), भिवंडी – मराठी
बजरंग सोनावणे, बीड – मराठी
सुप्रिया सुळे, बारामती – मराठी
अमोल कोल्हे, शिरूर – मराठी
ध्यैर्यशील मोहिते पाटील, माढा – मराठी
निलेश लंके, अहमदनगर – इंग्रजी
शिवसेना शिंदे गट
प्रतापराव जाधव, बुलढाणा – मराठी
संदीपान भुमरे, छत्रपती संभाजीनगर – मराठी
श्रीकांत शिंदे, कल्याण – मराठी
नरेश म्हस्के, ठाणे – मराठी
रवींद्र वायकर, मुंबई उत्तर पश्चिम – मराठी
श्रीरंग बारणे, मावळ – मराठी
धैर्यशील माने, हातकणंगले – मराठी
राष्ट्रवादी अजित पवार गट
सुनील तटकरे, रायगड – मराठी
अपक्ष
विशाल पाटील, सांगली – हिंदी
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community