गरीब घरचा मुलगा संविधानामुळेच तीन वेळा देशाचा पंतप्रधान झाला. त्याच संविधानाची चेष्टा राहुल गांधी करत आहेत. ५० वर्षपूर्वी देशावर आणीबाणी लादून लोकशाहीची हत्या करणारेच आता संसदेत संविधान हातात घेऊन फिरत आहेत, असे मत माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी मांडले. (Bharti Pawar)
यावेळी पुढे बोलताना भारती पवार म्हणाल्या, आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. या दिवसाची इतिहासात काळा दिवस म्हणून गणला गेला आहे. परंतु, प्रत्येक नागरिकाला इतिहासाची आठवण करून देण्याची गरज आहे. याच दिवशी संविधानाचा गैरवापर करून लोकशाहीची हत्या करण्यात आली. राष्ट्रपतींना पत्र देऊन रातोरात देशावर अघोषित आणीबाणी लादली. (Bharti Pawar)
(हेही वाचा – Vaishwik Hindu Rashtra Mahotsav : काश्मीरमध्ये हिंदू नरसंहार चालूच; आता बंगालची वाटचालही काश्मीरच्या दिशेने)
ही आणीबाणी लादताना इंदिरा गांधींनी स्वतःच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना सुद्धा माहीत दिली गेली नाही. यावडूनच किती एकाधिकारशाही होती हे लक्षात येईल असे त्या म्हणाल्या. तसेच कोणालाही ना सांगता मनमानी करुन कायदे बदलले. तर काही कायद्यांची मोडतोड करुन सोयीनुसार बदल केल्याचे देखील यावेळी भारती पवार म्हणाल्या. (Bharti Pawar)
या कालखंडात १ लाख ४२ हजार नागरिकांना अटकेत टाकले. यातले २२ लोक मृत्युमुखी पडले, तर ७ लाख लोक विस्थापित झाल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादले. छपाई कारखान्याची वीज घालवली. जेणेकरुन वृत्तपत्र प्रकाशित होणार नाहीत. अनेक नेत्यांना अटक केली. समाज सुधारक, विचारवंताना कोठडीत टाकले. इतकी इंदिरा गांधींनी तानाशाही केली. मिसा ऍक्ट चा गैरवापर केलेल्यांचे वंशज आज संविधानाची प्रत हातात घेऊन संसदेत फिरत असून संविधान बचावचा नारा देत असल्याचे भारती पवार यांनी सांगितले. (Bharti Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community