Pune drugs Case: पबच्या टॉयलेटमध्ये ड्रग्ज घेणाऱ्या तरुणांना पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात

141
Pune drugs Case: पबच्या टॉयलेटमध्ये ड्रग्ज घेणाऱ्या तरुणांना पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात
Pune drugs Case: पबच्या टॉयलेटमध्ये ड्रग्ज घेणाऱ्या तरुणांना पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात

पुण्यातील एफसी रोडवरील (Pune FC Rode) हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, ते ड्रग्ज व अंमली पदार्थांचे सेवन करत पार्टी करतात. पुण्यातील अशाच एका हॉटेलमधील पार्टीत ड्रग्स घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये, चक्क हॉटेलमधील वॉश रुममध्ये टॉयलेटजवळ बसून ते ड्रग्ज घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत होते. संबंधित प्रकरणांमध्ये पोलिसांनी अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांना पोलिसानी  पकडले असून, त्या तरूणांची ओळख पटली आहे. (Pune drugs Case)

(हेही वाचा – Vaishwik Hindu Rashtra Mahotsav : काश्मीरमध्ये हिंदू नरसंहार चालूच; आता बंगालची वाटचालही काश्मीरच्या दिशेने)

संबंधित L3 लॉऊन्ज पब (L3 Lounge Pub) प्रकरणात दोन्ही तरुणांनी ड्रग्जचं सेवन केल्याची कबुली दिली आहे. या दोन्ही तरुणांची ओळख अशाच पार्ट्यांमध्ये झाल्याचं समोर आलं आहे. यातील एक तरूण हा मुंबईतील गोरेगावचा असल्याची माहिती आहे. तर दुसरा तरूण हा पुण्यातील मुंढवा भागातील आहे. विशेष म्हणजे दोन्ही तरूण हे उच्चशिक्षित असून एकटा आर्किटेक्ट आहे तर दुसरा सॉफ्टेवअर इंजिनिअर आहे.  (Pune drugs Case)

मुंबईचा मित्र ड्रग्ज घेऊन पुण्यात आला

मुंबईत राहणारा तरूण हा आर्किटेक्ट आहे आणि तो मेफेड्रॉन घेऊन पुण्यात आला होता. तर दुसरा तरूण हा पुण्यातील मुंढव्यातील असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. या दोघांची ओळख एका पार्टीमध्ये झाली होती. अशी कबुली या तरुणांनी दिली. द कल्ट या पबच्या मालकावर देखील पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला द कल्ट या पबमध्ये पार्टी झाली आणि नंतर मध्यरात्री दीडनंतर पुढची पार्टी ही एल थ्रीमध्ये सुरू झाली. (Pune drugs Case)

(हेही वाचा – Pune Porsche Accident: बेदरकारपणे गाडी चालवून २ जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला सोडण्याचे हायकोर्टाचे आदेश)

यातील एका तरूणाला मुंबईतून अटक करण्यात आली तेव्हा त्याच्याकडे पाच ग्रॅम मेफेड्रॉन (Mephedrone) आढळून आले. हे मेफेड्रॉन त्यानं मुंबईतून खरेदी केले होते. त्यामुळे पुण्यासोबतच मुंबईमध्येही मेफेड्रॉन ड्रग्जची विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता पुणे पोलिसांसोबत मुंबई पोलिसांकडूनही केला जाण्याची शक्यता आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यातील सर्वात व्यस्त रस्त्यांपैकी एक असलेल्या एफ सी रोडवरील या लिक्विड लेझर लाउंज या पबमधे ड्रग्ज घेतलं जात असल्याचं उघड झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झालेत. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत या हॉटेलचा, मालक, मॅनेजर, कर्मचारी आणि पार्टीचे आयोजन करणाऱ्या व्यक्तींसह आठ जणांना अटक केलीय. रात्री एक वाजेपर्यंत पब सुरु ठेवण्यास परवानगी असताना पाठीमागच्या दराने रात्री दीड वाजता पन्नास जणांना या पबमधे प्रवेश देण्यात आला.  (Pune drugs Case)

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.