लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच इंडि आघाडी फुटली; TMC चे Congress सोबत पुन्हा बिनसले

अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) म्हणाले की, काँग्रेसने परस्पर हा निर्णय घेतला आहे. यामुळे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आता इंडि आघाडीला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतील.

232
लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच इंडि आघाडी फुटली; TMC चे Congress सोबत पुन्हा बिनसले
लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच इंडि आघाडी फुटली; TMC चे Congress सोबत पुन्हा बिनसले

तब्बल सात दशकांनी पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदाची (Lok sabha Speaker) निवडणूक होत आहे. २५ जून या दिवशी त्यासाठी मतदान होणार असून भाजपाने ओम बिर्ला, तर काँग्रेसने के. सुरेश यांना उमेदवारी दिली आहे. इंडि आघाडीकडून (INDIA Alliance) अध्यक्ष पदासाठीची उमेदवारी के सुरेश यांना देताना आमचे मत विचारले गेले नाही, असे म्हणून तृणमूल काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. ममता बॅनर्जी यांचा पुतण्या खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

(हेही वाचा – Pune Porsche Accident: बेदरकारपणे गाडी चालवून २ जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला सोडण्याचे हायकोर्टाचे आदेश)

उमेदवारी अर्जावर तृणमूलची सही नाही ?

अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) म्हणाले की, काँग्रेसने परस्पर हा निर्णय घेतला आहे. यामुळे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आता इंडि आघाडीला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतील. कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही, संभाषण झाले नाही, दुर्दैवाने हा एकतर्फी निर्णय आहे, असे ते म्हणाले. सुत्रांनुसार के सुरेश यांच्या उमेदवारी अर्जावर तृणमूलची सही नाही. आता अध्यक्ष पदासाठी तृणमूल काय भूमिका घेते, याकडे भाजपाचे आणि काँग्रेसचे लक्ष लागले आहे. काँग्रेसने विश्वासात न घेतल्याने तृणमूलचे खासदार तटस्थ देखील राहू शकतात.

इंडि आघाडीच्या नेत्यांची २५ जूनच्या सायंकाळी काँग्रेस (Congress) अध्यक्ष खर्गेंच्या निवासस्थानी बैठक झाली. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी ही बैठक झाली. अभिषेक बॅनर्जी यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर या बैठकीपूर्वीच इंडिया आघाडीत फाटाफूट झाल्याचे समोर आले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच आघाडीत झाली होती बिघाडी

इंडि आघाडीची स्थापना करणारे नितीशकुमार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपासोबत एनडीएत गेले. यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे वेगळे लढण्याची घोषणा केली होती. तेव्हापासूनच इंडि आघाडी फुटली होती. निकाल लागल्यानंतर खर्गेंनी पुन्हा ममतांना इंडि आघाडीत घेण्याचे प्रयत्न केले होते. परंतू लोकसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार देताना आपल्याला विश्वासात घेतले नाही, असा आरोप ममता यांच्या पक्षाने केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.