हॉटेल ताजमध्ये अवॉर्ड समारंभात एका कंपनीच्या महिला संचालकाचा मोबाईल फोन चोरी प्रकरणी कुलाबा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याला पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. (Theft)
मुंबईतील हॉटेल ताज मधील क्रिस्टल हॉल येथे शनिवारी सायंकाळी अवॉर्ड समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मुंबईसह राज्यभरातील अनेक कंपन्यांचे संचालक मंडळ हजर होते, या कार्यक्रमासाठी ठाण्यातील एका कंपनीची महिला संचालक उपस्थित होती. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ही महिला संचालक घरी जाण्यासाठी निघाली असता तिच्या पर्समध्ये असलेला अँपल कंपनीचा आयफोन १२ हा महागडा मोबाईल फोन आढळून आला नाही. (Theft)
या महिला संचालकाने याबाबत हॉटेल ताजच्या सुरक्षा रक्षकाकडे क्रिस्टल हॉलचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली. परंतु, सुरक्षा रक्षकांनी सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यास मनाई केल्यामुळे या संचालक महिलेने मोबाईल चोरी प्रकरणी ऑनलाईन तक्रार दाखल केली. दरम्यान, कुलाबा पोलिसांची सोमवारी रात्री संचालक महिलेची तक्रार दाखल करून अनोळखी व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Theft)
या गुन्हाचा तपास सुरु असताना गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने माझगाव येथून एकला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्हे शाखेने या व्यक्तीकडून चोरी केलेला आयफोन १२ जप्त करून आरोपीला पुढील तपासासाठी कुलाबा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कुलाबा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला नोटीस देऊन सोडले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा एका पब्लिकेशन कंपनीच्या मार्केटिंग विभागात कामाला आहे. शनिवारी झालेल्या अवॉर्ड समारंभात तो हजर होता, व त्यानेच संचालिका महिलेच्या पर्समधून तिचा आयफोन चोरीला केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Theft)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=eHrnD8EcIB4
Join Our WhatsApp Community