Maharashtra Vidhan Parishad Election 2024 : पदवीधर, शिक्षक मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरूवात; आता महायुती की महाविकास आघाडी?

196
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या निकालानंतरच राज्यात नवी राजकीय समीकरणे

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर (Maharashtra Vidhan Parishad Election 2024) तसेच शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा चार मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरूवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात प्रथमच दुसरी निवडणूक होत आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघ आहेत. त्यासाठी आज सकाळी सात वाजता मतदान सुरु झालेत. या जागांवर 1 जुलैला मतमोजणी होईल. त्यावेळी महायुती की महाविकास आघाडी कोणाची सरसी होते? हे स्पष्ट होईल. (Maharashtra Vidhan Parishad Election 2024)

मुंबईत महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत

मुंबई पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपाचे किरण शेलार यांच्यात थेट लढत होत आहे. मुंबई शिक्षक मतदार संघामध्ये ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर यांच्याविरोधात भाजपाचे शिवनाथ दराडे रिंगणात आहेत. तसेच सुभाष मोरे (शिक्षक भारती), शिवसेना पुरस्कृत उमेदवार शिवाजी शेंडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजी नलावडे रिंगणात आहे. यामुळे मुंबईत महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे. (Maharashtra Vidhan Parishad Election 2024)

कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदान सुरु

विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदान सुरु झाले आहे. कोकण विभाग पदवीधर मतदार संघात एकूण २ लाख २३ हजार २२५ मतदार आहे. यात सर्वाधिक मतदार ठाणे जिल्हयात म्हणजेच ९८ हजार ८६० इतके मतदार आहेत. यात ४२ हजार ४७८ स्त्री मतदार तर ५६ हजार ३७१ पुरुष आणि ११ तृतियपंथीय मतदार आहेत. यानुसार ठाणे जिल्ह्यात एकुण १२४ मतदान केंद्रे आहेत. या ठिकाणी एकूण 13 उमेदवार रिंगणात आहे. परंतु भाजपा आणि काँग्रेसमध्ये लढत आहे. भाजपकडून 2 वेळा आमदार झालेले निरंजन डावखरे यांच्या समोर काँग्रेसचे रमेश किर हे उमेदवार रिगणात आहेत. (Maharashtra Vidhan Parishad Election 2024)

नाशिकमध्ये सकाळी 7 वाजता मतदान सुरु

नाशिकमध्ये सकाळी 7 वाजता मतदान सुरु झाले आहे. 63 केंद्र आणि 90 बूथवर मतदन होत आहे. 69 हजार शिक्षक मतदार आपला आमदार ठरवणार आहेत. नाशिकमध्ये संदीप गुळवे – ठाकरे गट, किशोर दराडे – शिवसेना, ऍड महेन्द्र भावसार – अजित दादा गट, विवेक कोल्हे – अपक्ष यांच्यात लढत होत आहे. (Maharashtra Vidhan Parishad Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.