Damage Banganga Lake : कंत्राटदारास महानगरपालिकेच्या वतीने कारणे दाखवा नोटीस आणि नोंदवला एफआयआर

246
Damage Banganga Lake : कंत्राटदारास महानगरपालिकेच्या वतीने कारणे दाखवा नोटीस आणि नोंदवला एफआयआर
Damage Banganga Lake : कंत्राटदारास महानगरपालिकेच्या वतीने कारणे दाखवा नोटीस आणि नोंदवला एफआयआर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

ऐतिहासिक अशा बाणगंगा तलाव (Damage Banganga Lake) व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत कामे करताना तलावाच्या उत्तर प्रवेशद्वारावरून आत मध्ये एक्सकॅव्हेटर संयंत्र (Excavator) उतरवून तलावांच्या पायऱ्यांची हानी केल्याबद्दल संबंधित कंत्राटदारास महानगरपालिकेच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजावत तलावास हानी पोहोचवून नुकसान केल्याबद्दल मलबार हिल पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (FIR) देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हानी पोहोचलेल्या पायऱ्या दुरुस्त करण्याची कामे पूर्ववत करण्यात आली आहेत. (Damage Banganga Lake)

(हेही वाचा- Lok Adalat मध्ये निकाली लागतील प्रलंबित खटले; CJI नी व्यक्त केला विश्वास)

महानगरपालिकेचा विशेष प्राधान्य प्रकल्प

बाणगंगा ही पुरातन वास्तु आहे. अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे तलावाच्या पायऱ्या, पायऱ्यांचे दगड, दीपस्तंभांची दुरावस्था झाली होती. तसेच तलाव परिसरात पायऱ्यांवरील बांधकामे झाली होती. यास्तव, महाराष्ट्र राज्य शासनाच्या स्तरावर झालेल्या बैठकांनुसार तसेच राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री, स्थानिक आमदार तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या निर्देशानुसार  महानगरपालिकेमार्फत बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प महानगरपालिकेचा विशेष प्राधान्य प्रकल्प म्हणून घोषित करुन महानगरपालिकेने त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली. निविदा प्रक्रियेअंती पुरातन वारसा कामे (हेरिटेज) कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. (Damage Banganga Lake)

गाळ काढण्यासाठी हस्तचलित यंत्रणा

पुनरुज्जीवन प्रकल्पाचा एक भाग म्हणून मुंबई महानगरपालिकेमार्फत (Municipal Corporation) तलावातील सर्व बांधकाम तोडण्यात  आले. तसेच दीपस्तंभांची दुरूस्ती करण्यात आली आहे.  तसेच, प्रारंभी गाळ काढण्यासाठी हस्तचलित यंत्रणा उभी करण्यात येऊन गाळ काढण्यात येत होता. परंतु, कंत्राटदाराने मंगळवारी २४ जून २०२४ रोजी एक्सकॅव्हेटर संयंत्र (Excavator) बाणगंगा तलावाच्या उत्तर दिशेच्या प्रवेशद्वाराने उतरवले. याबाबतची माहिती मिळताच डी विभागाने सदर काम थांबविले. तसेच, हे संयंत्र बाहेर काढले आहे. (Damage Banganga Lake)

(हेही वाचा- लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच इंडि आघाडी फुटली; TMC चे Congress सोबत पुन्हा बिनसले)

पायऱ्या लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे निर्देश …

दरम्यान, स्थानिक आमदार तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी मंगळवारी  २५ जून २०२४ रोजी बाणगंगा तलाव येथे स्थळ पाहणी केली. यावेळी त्यांनी संयंत्रामुळे हानी झालेल्या पायऱ्या लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे निर्देश दिले होते.  यानंतर, बाणगंगा प्रकल्पाचे कंत्राटदार  सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रायव्हेट लिमिटेड यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच, मलबार हिल पोलिस ठाणे येथे प्रथम माहिती तक्रार (क्रमांक FIR-CR No.155/2024 Dt.25/06/2024) दाखल करण्यात आला आहे. (Damage Banganga Lake)

पायऱ्या व काढून ठेवलेले दगड यांची पुनर्स्थापना करण्याचे काम पूर्ण…

तसेच, संयंत्रामुळे हानी पोहोचलेल्या पायऱ्या दुरुस्त करण्याची कामे तात्काळ हाती घेण्यात आली. हानी पोहोचलेल्या पायऱ्या व काढून ठेवलेले दगड यांची पुनर्स्थापना करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून पूर्ववत स्वरूपात झाले आहे. तदअनुषंगाने पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच उर्वरीत कामेदेखील यापुढच्या काळात नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार आहेत, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे. (Damage Banganga Lake)

दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष, खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी एक्स वर  याचा व्हिडिओ पोस्ट करत खेद व्यक्त केला. या तलावात जाण्याच्या पायऱ्या ठेकेदारी आणि महापालिका यांनी नष्ट केल्या असून ठेकेदार आणि महापालिका विरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (Damage Banganga Lake)

(हेही वाचा- लोकशाहीची हत्या करणारेच संविधान हातात घेऊन फिरत आहेत; Bharti Pawar यांची टीका)

या पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत बाणगंगा तलाव परिसरातील ही विविध कामे घेण्यात आली आहेत.

– बाणगंगा तलावातील दगडी पायऱ्यांची सुधारणा करणे.

– बाणगंगा तलाव परिसरातील दीपस्तंभांचे पुनरुज्जीवन करणे.

– बाणगंगा तलावामध्ये आकर्षक विद्युत रोशणाई करणे.

– बाणगंगा तलावाच्या दगडी पायऱ्यांवरील अतिक्रमण हटविणे.

– रामकुंड या ऐतिहासिक व पवित्र स्थळाचे पुनरुज्जीवन करणे.

-बाणगंगा परिसरातील मंदिरांचा सर्वंकष विकास आराखडा तयार करणे व योजनाबद्ध पद्धतीने रूपरेषा ठरविणे.

-बाणगंगा तलावाकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यांची सुधारणा करणे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.