Arvind Kejriwal: केजरीवालांना मोठा धक्का! ED पाठोपाठ आता CBI कडून अटक

4678
Arvind Kejriwal: केजरीवालांना मोठा धक्का! ED पाठोपाठ आता CBI कडून अटक
Arvind Kejriwal: केजरीवालांना मोठा धक्का! ED पाठोपाठ आता CBI कडून अटक

दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांना ईडीने (अंमलबजावणी संचालनालयाने) अटक केली आहे. दरम्यान, आता या प्रकरणात सीबीआयची (केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभाग) (CBI) एंट्री झाली आहे. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतल्या राऊस अव्हेन्यू कोर्टात सुनावणी चालू असून केजरीवाल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर झाले होते. या सुनावणीनंतर केजरीवाल यांचे वकील विक्रम चौधरी यांनी सांगितलं की, केजरीवाल हे एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना आता सीबीआयने अटक केली आहे. (Arvind Kejriwal)

“आम्हाला याची कल्पनाच नाही”

केजरीवाल यांचे वकील विक्रम चौधरी यांनी या अटकेचा विरोध केला. चौधरी म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री (Arvind Kejriwal) दुसऱ्या एका प्रकरणात अगोदरच न्यायालयीन कोठडीत आहेत. असं असूनही त्यांना आता सीबीआयने अटक केली आहे. याबाबतचा कुठला तरी आदेश पारित झाला आहे आणि आम्हाला त्याची कल्पनाच नाही. ज्या पद्धतीने या सगळ्या घटना घडत आहेत ते पाहता हा चिंतेचा विषय आहे. ही अटक संविधानाच्या कलम २१ चं उल्लंघन आहे. केजरीवाल यांना सीबीआयने अटक केल्याची बातमी आम्हाला प्रसारमाध्यमांद्वारे समजली. त्यामुळे आम्ही न्यायालयाकडे मागणी केली आहे की सीबीआयने केजरीवाल यांच्या अटकेसाठी दाखल केलेला अर्ज आम्हालाही दिला जावा. (Arvind Kejriwal)

दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाकडून दणका

दरम्यान, यापूर्वी अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने अटक केल्यापासून ते तिहारमध्ये आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी १० मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यावर ते बाहेर आले होते. त्यानंतर त्यांनी मुदत संपताच आत्मसमर्पण केले. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाकडून दणका बसला आहे. (Arvind Kejriwal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.