Paris Olympic 2024 : घोडेसवारीत अनुष अगरवाल ला पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट

Paris Olympic 2024 : ड्रेसेज प्रकारात भारतीयाने ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे 

140
Paris Olympic 2024 : घोडेसवारीत अनुष अगरवाल ला पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट
Paris Olympic 2024 : घोडेसवारीत अनुष अगरवाल ला पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट
  • ऋजुता लुकतुके

भारतीय घोडेस्वार अनुष अगरवालाची (Anush Agarwala) पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympic 2024) ड्रेसेज प्रकारासाठी निवड झाली आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये खेळणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी इव्हेंटिंग प्रकारात भारतीय घोडेस्वार खेळले आहेत. पण, ड्रेसेजसाठी निवड झालेला अनुष हा पहिला भारतीय आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतही अनुषने पदक मिळवलं होतं. ड्रेसेजसाठीच्या ऑलिम्पिक पात्रता मुदतीत अनुषने सलग चारदा ऑलिम्पिकचे निकष पूर्ण केले होते. त्यामुळे भारताला एक कोटाही मिळाला. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- National Park खाली करा; हायकोर्टाने बेकायदा झोपडपट्टीधारकांना सुनावलं)

आता अनुषची निवड भारतीय घोडेसवारी संघटनेनं घेतलेल्या निवड चाचणीच्या आधारे झाली आहे. त्यासाठी अनुषची स्पर्धा अनुभवी श्रुती व्होराशी (Shruti Vora) होती. अनुषच्या चारच्या तुलनेत श्रुतीने दोनदा ऑलिम्पिक पात्रता निकष पूर्ण केले होते. पण, अनुष आणि त्याचा घोडा सर कॅरामेलो ओल्ड यांनी आपल्या कामगिरीतील सातत्य कायम ठेवत ऑलिम्पिकसाठी स्थान पक्कं केलं. (Paris Olympic 2024)

 दोघांच्या कामगिरीचा आढावा भारतीय घोडेसवारी संघटनेनं घेतला. त्यासाठी त्यांचे सरासरी गुण काढण्यात आले. अनुषचे गुण ६७.६९५ इतके भरले. तर श्रुती व्होराचे (Shruti Vora) सरासरी गुण ६७.१६३ इतके होते. त्या निकषांवर मग अनुष आगरवालाची (Anush Agarwala) निवड करण्यात आली. घोडेसवारी संघटनेनं एकमताने अनुषची निवड जाहीर केली. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- David Warner Retires : ऑस्ट्रेलियाचा अव्वल सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त )

यापूर्वी टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून फौवाद मिर्झा खेळला होता. तर २००० च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये इम्तियाझ अनिस तर १९९६ च्या ॲटलांटा ऑलिम्पिकमध्ये जितेंद्रजीत अहलुवालिया आणि हुसेन सिंग खेळले होते. पण, ड्रेसेज प्रकारात भारताची ही पहिलीच एंट्री असेल. (Paris Olympic 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.