Hindu : हिंदूंची घटती लोकसंख्या देशासाठी धोक्याची घंटा; मंजिरी मराठे यांनी मांडले वास्तव

गोवा येथील श्री रामनाथ देवस्थान येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव येथे मंजिरी मराठे बोलत होत्या.

270

हिंदूंनी त्यांचे संख्याबळ वाढवणे ही देखील हिंदूंची ताकद आहे, असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते. परंतु याबाबत हिंदू (Hindu) सजग नाहीत, मुसलमानांनी मात्र हे जाणले आहे, त्यामुळे ते त्यांची संख्या वाढवत आहेत. पण हिंदू ‘हम दो हमारे दो’, नंतर ‘हम दो हमारा एक’ आणि आता ‘हम दो और हमारा कुत्ता’ अशी स्थिति आहे. मी गेली 40 वर्षे मुंबईत राहत आहे, पूर्वी कधी आजूबाजूला बुरखाधारी महिला दिसत नव्हत्या आता जागोजागी दिसत आहेत, याचे कारण त्यांची वाढती लोकसंख्या, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे, असे सांगत आपण लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी बाहेर पडलो नाही, त्यामुळे काँग्रेस आणि उबाठाचे खासदार निवडून आले, त्यांना कुणी मतदान केले. जे सगळे जण जाणतात. त्या सगळ्यांना मुसलमानांनी मते दिली. या निवडणुकीत मुसलमानांनी 80 टक्के मतदान केले, पण हिंदूंनी अनेक ठिकाणी 40 टक्के देखील मतदान केले नसावे अशी हिंदूंची दयनीय स्थिती आहे, अशा शब्दांत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी सध्याचे वास्तव मांडले.

हिंदू जातीपातीत विभागले 

गोवा येथील श्री रामनाथ देवस्थान येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव येथे मंजिरी मराठे बोलत होत्या. या देशात बहुसंख्य आणि अल्पसंख्यांक या दोघांना एकच कायदा लागू असावा, ज्यामुळे बहुसंख्याकांना जास्त अधिकार मिळणार नाही आणि अल्पसंख्याकांना जास्त सुविधा मिळणार नाही, असे सावरकरांचे विचार होते. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवला पाहिजे, रस्त्यावर तो आणण्याची गरज नाही, पण विधर्मी तसे वागत नाहीत, त्यामुळे हिंदूंनाही आता विधर्मीयांप्रमाणे वागून संघटित होवून याचा विरोध केला पाहिजे. हिंदू  (Hindu) जातीपातीत विभागले गेले आहेत. वीर सावरकर म्हणाले होते, खरी जात मनुष्य, खरा ग्रंथ मानवता, खरा देश पृथ्वी, खरा राजा ईश्वर, वासुदेव कुटुंबकम्, जे वेदांमध्ये सांगितली आहे तीच वीर सावरकर यांच्या हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे. ही संकल्पना वास्तवात उतरवणे कठीण आहे, पण आपल्याला संघटित होणे खूप आवश्यक आहे. एक वेळ माझी समुद्रातील उडी विसरलात तरी चालेले पण मी केलेले हिंदू संघटनांचे कार्य कधीच विसरू नका, असे वीर सावरकर बोलले होते. आपण आज या दोन्ही गोष्टी विसरून गेलो आहोत. वीर सावरकरांनी म्हटले होते की, जो देश आपला इतिहास विसरतो त्या देशाचा भूगोल बदलतो. १९४७ मध्ये आपला भूगोल बदलला होता. आपल्या देशाचे दोन तुकडे झाले. आजच्या घडीला आपल्या देशात कित्येक ठिकाणी पाकिस्तान निर्माण झाले आहेत. वीर सावरकर यांनी सांगितले होते की, आपल्या देशाच्या सर्व सीमा सुरक्षित झाल्या पाहिजेत, आपण त्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे आज आपल्या सीमेवर संकटे निर्माण झाली आहेत. बांगलादेशातून गाड्या भरभरून मुसलमान येत आहेत. आज मुसलमानांची लोकसंख्या ५० टक्क्यांच्या आसपास झाली असेल. आपण यावर काहीच करत नाही कारण आपण आपला देश स्वतंत्र कसा झाला हेच विसरून गेलो आहोत, असे मंजिरी मराठे म्हणाल्या.

(हेही वाचा Vaishwik Hindu Rashtra Mahotsav : काश्मीरमध्ये हिंदू नरसंहार चालूच; आता बंगालची वाटचालही काश्मीरच्या दिशेने)

मुसलमानांची निष्ठा देशाशी नाहीच  

आपल्या सर्व देवतांच्या हातांमध्ये शस्त्रे आहेत. पण आपल्याला शिकवण्यात आले की, एका गालावर कुणी थप्पड मारली तर लगेच दुसरा गाल समोर करावा, आमचे स्वत्व हिसकावून घेण्यात आले. ब्रिटिशांनी शस्त्र बंदीचा कायदा लागू केला. वीर सावरकर यांना लंडनला जावे लागले, कारण त्यांना क्रांतीची सुरुवात करायची होती आणि शस्त्राच्या शिवाय क्रांती करू शकत नाही. बॉम्ब बनवण्याची कृती जाणून घेण्यासाठी वीर सावरकर यांना लंडनला जावे लागले. पुढे त्यांना अंदमानात ठेवण्यात आले, तिकडे ते १० वर्षे होते. त्यानंतर त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आले. तिथे त्यांना सुरुवातीला 5 वर्षे ठेवण्यात आले, मात्र ब्रिटिश त्यांना इतके घाबरत होते की त्यांनी त्यांची स्थानबद्धता 13 वर्षे वाढवली. आशा प्रकरे 23 वर्षे सावरकर ब्रिटिशांच्या ताब्यात होते. त्या ठिकाणी खिलाफत चळवळीला विरोध केला. ही चळवळ ब्रिटिशांच्या विरोधात नव्हती तर तुर्कस्थानमध्ये केमाल पाशाने खलिफाचे पद काढून तिथे आपले राज्य स्थापन केले. देशातील मुसलमानांचा याच्याशी काहीही संबंध नव्हता. जगभरातील मुसलमानांनीही याला विरोध केला नाही पण भारतातील मुसलमानांनी याविरोधात आंदोलन सुरू केले. गांधीजी हे या आंदोलनाचे स्वतः नेते बनले. मुसलमानांनीही गांधीना या आंदोलनाचे नेते मानले नव्हते, वीर सावरकर यांनी म्हटले ही खिलाफत नव्हे तर आफत आहे, या आंदोलनातून देशाचे विभाजन होणार आहे, असे ते म्हणाले. त्यांनी म्हणून मग हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला, वैदिक सनातनी हिंदू, जैन, शीख, पारसी, बौद्ध हे सगळे हिंदू  (Hindu) आहेत, ज्यामध्ये मुसलमान आणि ख्रिस्ती येत नाहीत, कारण त्यांची निष्ठा ही या देशाशी नाही, असे वीर सावरकर म्हणत, ही त्यांच्यासाठी पुण्यभूमी नाही. जर मुसलमान आणि ख्रिस्ती हे त्यांच्या धर्माचा आग्रह सोडून देतील तर मीदेखील माझ्या धर्माचा आग्रह सोडून देईन, पण तसे झाले नाही, असे मंजिरी मराठे म्हणाल्या. आपण सर्व झोपलेलो आहेत.आमचा इतिहास हा पराभूतांचा नाही. छात्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवा हे कधी हरले नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. पण नंतर आपण सुस्त राहिलो, झोपून गेलो. बाजीराव पेशवा आला, त्यांनी पराक्रम केला, त्यानंतरही आपण झोपून राहिलो. आजही आपण झोपलेले आहोत.  झोपलेल्यांना कसे जागे करणार? प.पू. डॉ. आठवले यांनीही सांगितले की, झोपलेल्यांना जागे करू नका, जे जागृत हिंदू आहेत, त्यांना संघटित करून कार्य करा, असे मंजिरी मराठे म्हणाल्या.

हिंदी भाषेला विरोध ही दुर्दैवी बाब

वीर सावरकर यांनी आणखी एक मोठे कार्य केले ते म्हणजे हिंदी भाषेचा प्रचार केला. त्यावेळी काँग्रेस आणि गांधीजी हे उर्दू भाषेचा उदोउदो करत होते, लंडनमध्ये असतानाही वीर सावरकर यांनी आपली राष्ट्र भाषा हिंदी असेल असेच म्हटले. त्यावेळी वीर सावरकर यांनी जे प्रयत्न केले, त्यामुळे आज हिंदी भाषा ही आपली राष्ट्र भाषा आहे. दुर्दैवाने दक्षिण भारत किंबहुना महाराष्ट्रातही हिंदी भाषेला विरोध होत आहे. वीर सावरकर म्हणायचे संपूर्ण देशाची हिंदी ही एकमेव संपर्क भाषा बनली पाहिजे, अंदमानातही त्यांनी या भाषेचा उपयोग केला. वीर सावरकर यांनी मराठी भाषेसाठी अनेक प्रतिशब्द दिले. जसे छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजभाषाकोश तयार केला होता, तसे काम वीर सावरकर यांनी केले होते. पण आज काय होते, मराठी भाषा ब्राह्मणांची भाषा असे नेरेटीव्ह सेट केले जात आहे आणि या भाषेचा विरोध केला जात आहे, माध्यमे वीर सावरकर यांनी दिलेल्या मराठी शब्दांचा वापर करत नाही, ब्राह्मणाची भाषा प्रमाण का मानावी, असे ते म्हणत आहेत. आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत. म्हणून आपण सगळ्यानी आता संघटित झाले पाहिजे. रणजित सावरकर यांनी जी ओम प्रमाणपत्राची संकल्पना मांडली आहे. त्याला हिंदू मोठ्या प्रमाणात समर्थन देत आहेत. आपण सगळे जण संघटित होवून कार्य केले पाहिजे, 2047 ला जर आपल्याला आपला देश वाचवायचा असेल तर आपल्याला जागृत झाले पाहिजे, असेही मंजिरी मराठे म्हणाल्या.  (Hindu)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.