Bajra: बाजरीची भाकरी करण्याची अतिशय सोपी पद्धत कोणती ? जाणून घ्या…

बाजरीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते. वजन कमी करण्यासाठी बाजरी हा एक चांगला पर्याय आहे.

127
Bajra: बाजरीची भाकरी करण्याची अतिशय सोपी पद्धत कोणती ? जाणून घ्या...

निरोगी आरोग्यासाठी आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश करणे आवश्यक आहे. बाजरीची भाकरी विशेषत: पौष महिन्यात खाल्ली जाते. हा थंडीचा महिना असतो. भोगीच्या भाजीसोबत वरून तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी अतिशय चविष्ट लागते. बाजरी (Bajra) भाकरी गोल गरगरीत बनवण्याचे एक कौशल्य आहे. भाकरी छान मऊ आणि टम्म फुगली की, ती लगेचच खावीशी वाटते. जाणून घेऊया, शरीराला ऊब देणाऱ्या, पौष्टिक बाजरीच्या भाकरीची रेसिपी –

(हेही वाचा – Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात १ दहशतवादी ठार, चकमक सुरूच)

साहित्य
बाजरीचं पीठ, तीळ, मीठ, पाणी

कृती
सर्वप्रथम परातीमध्ये ताजं दळलेलं बाजरीचे वाटीभर पीठ घ्या. आवडीनुसार पीठात काही जण मीठही घालतात. साधारणपणे बाजरीच्या पिठाला स्वतंत्र चव असते. त्यामुळे मीठ घातले नाही, तरी चालते. नंतर आवश्यकतेनुसार, थोडेसे पाणी घालून पीठ चांगले मळून घ्या. पीठ मऊ करण्यासाठी गरम पाणी वापरू शकता. त्यानंतर पीठ चांगले मळून झाल्यानंतर पीठाचा गोळा घ्या आणि हातावर थोडे सुके पीठ घ्या आणि बोटांच्या मदतीने पिठाच्या कड्यांना दाब देऊन गोलाकार आकार द्या. त्यानंतर परातीत थोडे सुके पीठ पसरवा. जेणेकरून गोळा थापताना परतीवर चिकटणार नाही. नंतर पिठाच्या मध्यभागी फुगलेला भाग हलक्या हाताने लाटण्यास सुरुवात करा. भाकरी थापताना गोल गोल फिरत राहिली. त्यामुळे त्यावर तीळ टाकायला विसरू नका. भाकरी थापून तयार करायला वेळ नसेल किंवा पाणी खूप घट्ट असेल तर हलकेच पाणी लावून फुगलेल्या बाजू सपाट करा.

दुसरीकडे लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवा. गॅसची फ्लेम हाय ठेवा. तवा गरम झाल्यानंतर हलक्या हाताने भाकरी उचलून, पीठ लागलेली बाजू वर ठेवून भाकरी तव्यावर पसरून घाला. वरच्या बाजूला थोडे पाणी लावून दुसऱ्या बाजूला भाकरी पलटून घ्या. लक्षात ठेवा पाणी लावल्यानंतर भाकरीची बाजू लगेच पलटावी, पाणी सुकून दिले तर भाकर एका बाजूला करपते आणि त्याचा पोत बिघडतो. दुसरी बाजू चांगली भाजल्यानंतर तिसऱ्यांदा भाकरी फुलून वर आली की समजावे की भोगी विशेष परफेक्ट बाजरीची भाकरी खाण्यासाठी तयार आहे.

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीची भाजी आणि तीळ आणि बाजरीच्या सहाय्याने बनवलेल्या भोगीची भाजी आणि बाजरीचा आस्वाद घेतला जातो. भोगीच्‍या भाजीसोबत परफेक्ट बाजरीची भाकरी बनवण्‍याचे एक कौशल्य आहे. ते जर अवगत झाले तर बाजरीची भाकर छन मऊ आणि टम्म फुगून तयार होतील.

बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे
– अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण बाजरीमध्ये जास्त असते.
– बाजरीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते. वजन कमी करण्यासाठी बाजरी हा एक चांगला पर्याय आहे.
– बाजरीमुळे पचन सुरळीत राहते.
– बाजरीमध्ये मॅग्नेशियम आणि इतर आरोग्यदायी घटक भरपूर प्रमाणात असतात.
– हाडे मजबूत होण्यासाठी बाजरीचे नियमित सेवन करावे. यातील फॉस्फरस आणि कॅल्शियममुळे हाडे मजबूत राहतात. याकरिता तूप लावलेली बाजरीची भाकरी खावी.
– ह्रदयाचे आरोग्य सुधारते.
– डोळ्यांचे आरोग्य सुधारते, कारण यामध्ये जीवनसत्त्व ए असते.
-त्वचेचे सौंदर्य वाढते. बाजरीतील झिंक घटक मृत त्वचेच्या पेशी दुरुस्त करतो.

हेही पहा – 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.