Kho Kho News : तुषार सुर्वे आणि संजीव ठाकूर देसाई यांना खो-खो ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार

Kho Kho News : मुंबई खो-खो संघटनेकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात.

121
Kho Kho News : तुषार सुर्वे आणि संजीव ठाकूर देसाई यांना खो-खो ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार
  • ऋजुता लुकतुके

खो-खो क्षेत्रात केलेल्या अमूल्य कार्याचा व दिलेल्या योगदनाचा गौरव म्हणून यावर्षीचा “कै. एकनाथ साटम जेष्ठ कार्यकर्ता गौरव पुरस्कार” अमर हिंद मंडळाचे संजीव ठाकूर देसाई व सरस्वती स्पो. क्लबचे तुषार सुर्वे यांना बहाल करण्यात आला आहे. मुंबई खो-खो संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोहिनूर हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. (Kho Kho News)

तुषार सुर्वे यांनी १९७४ पासून खो-खो खेळायला सुरुवात केली. जी के पाटील सर यांच्याकडून लंगडी, खो-खो आणि ॲथलेटिक्सचे धडे घेतले. कै. विश्वास कोरे यांच्या सरस्वती स्पोर्ट्स क्लब माहीम येथे खेळायला १९७४ पासून सुरुवात केली. सरस्वती स्पोर्ट्स क्लब माहीमचे खेळाडू म्हणून तर त्यानंतर पंच प्रशिक्षक म्हणून तुषार सुर्वे यांनी काम पाहिले. सरस्वती स्पोर्ट्स क्लब, माहीमला कै. विश्वास कोरे यांच्या पश्चात आपल्या इतर सहकार्यांसोबत समर्थपणे सरस्वती स्पोर्ट्स क्लब, माहीमला पुढे आणण्यात त्यांनी यश मिळवले. (Kho Kho News)

(हेही वाचा – मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या Jayakwadi Damची ड्रोनने रेकी!)

मुंबई खो-खो संघटनेत आपण १९८९ पासून खजिनदार म्हणून सुमारे १४ वर्षे काम पाहिले त्यानंतर प्रमुख कार्यवाह या नात्याने ३ वर्षे तर कार्याध्यक्ष म्हणून ४ वर्षे काम पाहिले. त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी २०२४ पर्यंत काम केले. मुंबई खो-खो संघटनेत कार्यकारणीवर तुषार सुर्वे हे सलग ३६ वर्ष कार्यरत राहिले आहेत. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन मध्ये पहिल्यांदा शासकीय परिषद सदस्य म्हणून व त्यानंतर ८ वर्षे खजिनदार म्हणून सुध्दा तुषार सुर्वे यांनी समर्थपणे धुरा सांभाळली व त्या पश्चात परत शासकीय परिषद सदस्य म्हणून २०२४ पर्यंत मुंबईचे प्रतिनिधित्व केले. त्याचबरोबर भारतीय खो-खो फेडरेशन मध्ये विविध उपसमितीवर त्यांनी काम पाहिले आहे. खो-खो क्षेत्रामध्ये खेळाडू ते कार्यकर्ता म्हणून त्यांनी ५० वर्षे पूर्ण केली आहेत. (Kho Kho News)

संजीव ठाकूरदेसाई यांचे शाळेचे शिक्षण पिटो विला हायस्कूल इथं झालं. तर महाविद्यालयाचे शिक्षण रूपारेल महाविद्यालयातून झाले. संजीव ठाकूर देसाई यांनी सुरवातीला १९७४-७५ मध्ये वैभव क्लबमधून खो-खो खेळायला सुरुवात केली व किशोरवयीन स्पर्धा तेथून खेळल्या. त्यानंतर १९७६-७७ मध्ये संजीव ठाकूर देसाई हे अमर हिंद मंडळ दादर येथे खेळाडू म्हणून दाखल झाले. १९८० ते १९९५ पर्यंत अमर हिंद मंडळ व महात्मा ज्योतिबा फुले शाळेत खो-खो प्रशिक्षक म्हणून कार्य करताना अमर हिंद मंडळाचा महिलांचा संघ अखिल भारतात नावाजलेला होता याच दरम्यान त्यांनी अमर हिंद मंडळात विविध पदांवर काम केले व १९९५ साली मंडळाच्या संयुक्त सचिव पदावरून राजीनामा दिला व १९९५ साली समता क्रीडा मंडळ या कबड्डी संघाची स्थापना केले. पुढे सलग ६ वर्षे हा कबड्डीचा संघ मुंबईत एक विजेता संघ म्हणून अनेक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा जिंकत होता. मुंबई महापौर स्पर्धा सुद्धा हा संघ जिंकला. (Kho Kho News)

(हेही वाचा – Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात १ दहशतवादी ठार, चकमक सुरूच)

संजीव ठाकूर देसाई सर यांनी २०१० ते २०२३ पर्यंत रूपारेल महाविद्यालय संघाचा खो-खो प्रशिक्षक म्हणून काम केले. २०१० ते २०१७ पर्यंत रूपारेल महाविद्यालयामध्ये जिमखाना सहाय्यक म्हणून काम केले त्यामुळे खो-खो व्यतिरिक्त इतर १६-१७ खेळांचा त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. मुंबई खो-खो संघटनेत संजीव ठाकूर देसाई सर यांनी २००० ते २००६ या कालावधीत कार्यकारणी सदस्य म्हणून काम केले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन मध्ये संजीव ठाकूर देसाई यांनी २००१ ते २००६ दरम्यान सांख्यिकी मंडळाचा अध्यक्ष तर २००६ ते २०१० तांत्रिक समिती सदस्य तर २०१० ते २०१४ दरम्यान तांत्रिक समिती अध्यक्ष म्हणून काम केले. २०१४ ते २०२० यादरम्यान स्पर्धा समिती सदस्य तर सद्यस्थितीत २०२१ ते आजपर्यंत राज्याच्या तक्रार निवारण समितीवर ते काम करीत आहेत. (Kho Kho News)

या दोघांनी क्रीडा क्षेत्रात व विशेषत: खो-खो क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेत त्यांना “कै. एकनाथ साटम जेष्ठ कार्यकर्ता गौरव पुरस्कार” देऊन मुंबई खो-खो संघटने तर्फे गौरवण्यात आले आहे. सदर गौरव पुरस्कार संघटनेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष-अॅड. अरुण देशमुख व दीपक शिंदे (मार्केटिंग हेड – सामना) यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. त्यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब (बाळ) तोरसकर, प्रफुल्ल पाटील, चंद्रकांत तरळ, कार्याध्यक्ष सुधाकर राऊळ, कार्योपाध्यक्ष विकास पाटील, प्र. कार्यवाह सुरेन्द्र विश्वकर्मा, खजिनदार डलेश देसाई, सहकार्यवाह – श्रीकांत गायकवाड, पराग आंबेकर, अक्षया गावडे-चिपळूणकर, रुपेश शेलटकर आदि खोखो प्रेमी उपस्थित होते. (Kho Kho News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.