NEET Paper Break Case: लातूरनंतर आता NEET पेपरफुटीचं धाराशिव कनेक्शन, घराला कुलूप लावून आरोपी मुलाबाळांसह फरार; नेमकं प्रकरण काय ? जाणून घ्या…

वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट' पेपर फुटीप्रकरणातील आरोपी संजय जाधव हा सोलापुरातील माढ्याच्या प्राथमिक शाळेत गेल्या वर्षभरापासून उपशिक्षकाचं काम करत होता.

172
NEET पेपर लीकप्रकरणी CBIची पहिली अटक, उमेदवारांसाठी प्ले स्कूल बुक केल्याचा आरोप; नेमकं प्रकरण जाणून घ्या
NEET पेपर लीकप्रकरणी CBIची पहिली अटक, उमेदवारांसाठी प्ले स्कूल बुक केल्याचा आरोप; नेमकं प्रकरण जाणून घ्या

देशभरात सद्यस्थितीत नीट परीक्षेतील (NEET) घोटाळ्यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले जात आहेत. बिहार, गुजरातनंतर (Bihar, Gujarat) महाराष्ट्रातील लातूर, सोलापूरमध्येदेखील नीट पेपर फुटीचे कनेक्शन समोर आले. अखेर पोलिसांनी यासंदर्भात दोघांना अटक केलेली आहे, तर फरार असलेल्या दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना या प्रकरणात आता लातूरनंतर धाराशिव कनेक्शनदेखील समोर आले आहे, तर फरार आरोपी हा २ दिवसांपासून घराला कुलूप ठोकून फरार झालेला आहे.

लातूर जिल्ह्यातील कनेक्शन उघड झाल्यानंतर आता सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात नीट प्रकरणाचं कनेक्शन असल्याचं उघडकीस आलं आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील उपशिक्षक संजय जाधव यास अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे अद्यापही दोन आरोपी फरार असून पोलिसांकडून दोघांचा शोध घेण्यात येत आहे.

(हेही वाचा – Kho Kho News : तुषार सुर्वे आणि संजीव ठाकूर देसाई यांना खो-खो ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार)

वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ पेपर फुटीप्रकरणातील आरोपी संजय जाधव हा सोलापुरातील माढ्याच्या प्राथमिक शाळेत गेल्या वर्षभरापासून उपशिक्षकाचं काम करत होता. जिल्हा परिषद शाळेत असणाऱ्या उपशिक्षकाचं नाव नीट परीक्षा कनेक्शनमध्ये आल्यानं माढा तालुक्याच्याच नव्हे तर सोलापूर जिल्ह्याच्या शिक्षण विभागातही खळबळ माजली आहे.

इरान्ना कोंगलवार, गंगाधर यांचा शोध सुरू
त्यानंतर आता या प्रकरणातील आणखी एक आरोपी धाराशिव जिल्ह्याच्या उमरग्यातील असल्याचे पोलिस तपासातून समोर आले. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोन आरोपी अटक आहेत तर दोनजण फरार आहेत. पोलिसांकडून आरोपी इरान्ना कोंगलवार आणि गंगाधर याचा शोध सुरू आहे. यातील फरार आरोपी इरान्ना कोंगलवार हा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआयमध्ये नोकरी करतो. मात्र, तो मागील अनेक वर्षापासून लातूर शहरातील औसा रोड भागात राहत आहे. शनिवारपासून त्याच्या घराला कुलूप असून पत्नी आणि तीन मुलांना घेऊन तो बेपत्ता झाला आहे. त्यामुळे, पोलिसांकडून आरोपी इरान्ना कोंगलवारचा शोध घेत आहेत.

पोलीस पथक उत्तराखंडला रवाना
आरोपी इरान्नाच्या मागावर असून फरार आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांचे अनेक पथके रवाना करण्यात आली आहेत. लातूर पोलिसाचं एक पथक उत्तराखंड भागात रवाना झालं असून उत्तराखंड भागात पोलिसाचे पथक दाखल झाले आहे. दोन आरोपी फरार असल्याने पोलिस नेमके कोणाच्या मागावर आहेत. ते अद्याप कळालेले नाही.

मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण निलंबित
नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी जलीलखाँ पठाण यावर जिल्हा परिषदेनं निलंबनाची कारवाई केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी निलंबित केलं आहे. ते लातूर जिल्ह्यातील कातपर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक होता, असं निलंबन आदेशात म्हटलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.