- ऋजुता लुकतुके
आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) पदक विजेत्या खेळाडूंना मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने वाढ केली आहे. सुवर्ण पदक जिंकणारा खेळाडू आता १ कोटी रुपये मिळवेल. तर रौप्य पदकासाठी ७५ लाख आणि कांस्य पदकासाठी ५० लाख रुपये इतकी रक्कम आयओसीने ठरवली आहे. २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहेत. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या बक्षिसाच्या व्यतिरिक्त आयओसीकडून ही रक्कम खेळाडूंना दिली जाईल. (Paris Olympic 2024)
सरकारकडून ऑलिम्पिक पदक विजेत्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकासाठी अनुक्रमे ७५ लाख, ५० लाख आणि ३० लाख रुपयांची रक्कम दिली जाते. ऑलिम्पिक असोसिएशनने २०१८ पासून रोख रकमेची बक्षिसं खेळाडूंसाठी सुरू केली. तेव्हाच्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना आयओसीकडून सुवर्ण पदकासाठी ५ लाख रु, रौप्य पदकासाठी ३ लाख रुपये आणि कांस्य पदकासाठी २ लाख रुपये देण्यात आले होते. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा – Bank of Maharashtra Share Price : बँक ऑफ महाराष्ट्र विकणार १,००० कोटींचे टिअर २ बाँड)
ही असणार वाढवलेली रक्कम
तेव्हापासून आयओसीकडून पदक विजेत्यांना नियमितपणे बक्षिसाची रक्कम मिळत आहे. २०२०च्या टोकयो ऑलिम्पिकसाठी सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राला ७५ लाख रुपये मिळाले. तर रौप्य पदकासाठी ५० लाख आणि कांस्य पदकासाठी २५ लाख रुपये देण्यात आले होते. आता या बक्षिसाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. (Paris Olympic 2024)
आयओसीला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला १० पदकं तरी मिळतील अशी आशा वाटत आहे. त्यामुळे खेळाडूंच्या बक्षिसासाठी संघटनेनं ७ कोटी रुपये बाजूला काढून ठेवले आहेत. तसंच हॉकी या सांघिक खेळात भारताला पदक मिळालं, तर त्यासाठी संघटनेनं वेगळा विचार केला आहे. हा सांघिक खेळ असल्यामुळे प्रत्येक खेळाडूला बक्षीस द्यावं लागेल. म्हणून संघाने सुवर्ण जिंकलं तर प्रत्येक खेळाडूला २ कोटी रु, रौप्य जिंकल्यास १ कोटी रुपये आणि कांस्य जिंकल्यास प्रत्येकी ७५ लाख रुपये देण्यात येतील. ऑलिम्पिक दरम्यान पॅरिसमध्ये असलेले खेळाडू, पदाधिकारी आणि सपोर्ट स्टाफ यांचा दैनंदिन भत्ताही यावेळी आयओसीने वाढवला आहे. प्रत्येकाला दर दिवशी ५० डॉलर रुपये खर्चासाठी मिळणार आहेत. (Paris Olympic 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community