Baramati Jail: बारामतीच्या जिल्हा कारागृहास आता वर्ग -३चा दर्जा

162
Baramati Jail: बारामतीच्या जिल्हा कारागृहास आता वर्ग -३चा दर्जा

बारामती येथील गृह विभागाच्या सबजेलच्या बांधकामासाठी राज्य शासनाने १४ कोटी ९६ लाख रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी दिली असून या पुढील काळात बारामतीच्या जिल्हा कारागृहाचा दर्जा २ ऐवजी ३ असेल. या संदर्भात राज्य शासनाने अध्यादेश जारी केला असून आता शासन निर्णयानुसार, बारामती शहर सबजेल (Baramati Jail) या कारागृहास या पुढील काळात बारामती जिल्हा कारागृह वर्ग दोन ऐवजी वर्ग तीन घोषित करण्यात आले आहे.

याबाबतच्या शासन परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, दिनांक २६.४.२०२३ च्या शासन निर्णयान्वये “बारामती शहर, सबजेल” या कारागृहास “बारामती जिल्हा कारागृह वर्ग-२” असे घोषित करण्यात आले.

(हेही वाचा – Vaishwik Hindu Rashtra Mahotsav : असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करा; वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ठराव मंजूर )

निवासस्थानेदेखील बांधण्यात येणार
कारागृहातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास कारागृह परिसरातील अधिकारी/कर्मचारी यांना तातडीने कर्तव्यावर बोलावून परिस्थिती आटोक्यात आणण्याकरिता कारागृह नियमावलीतील तरतुदीनुसार, कारागृह परिसरातच शासकीय निवासस्थान असणे आवश्यक असल्याने, सदर कारागृहाची बंदी क्षमता कमी करून निवासस्थानेदेखील याच भूखंडामध्ये बांधण्यात येणार आहेत.

शासन निर्णयामध्ये ‘ही’ सुधारणा
त्यामुळे, आता बारामती जिल्हा कारागृह वर्ग-२ ची बंदी क्षमता १३० इतकी होणार असल्याने सदर कारागृहास बारामती जिल्हा कारागृह वर्ग-३ म्हणून घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव कारागृह विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून शासनास प्राप्त झाला होता. त्याअनुषंगाने, २६ एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयामध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.