शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया बुधवारी २६ जून रोजी पार पडली. या मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या वतीने नैमित्तिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. परंतु या मतदानासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC) पूर्ण दिवस अथवा अर्धदिवस सुट्टी जाहीर करण्यात आली नाही. त्यातक कहर म्हणजे मतदानाच्या दिवशी म्हणजे बुधवारी सायंकाळी पाचच्या वेळेत महापालिकेच्या सामान्य प्रशासनाच्यावतीने परिपत्रक जाहीर करण्यात आले.त्यामुळे निवडणूक आयोगाला दाखवण्यासाठी हे परिपत्रक काढले असले तरी सुट्टी किंवा सवलत न देण्याची कोणतीही जाहीर घोषणा न केल्याने महापालिका सेवेतील पदवीधर तसेच शिक्षक मतदारांना मतदानाचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे अशाप्रकारची चूक करणाऱ्या सामान्य प्रशासन विभागावर निवडणूक आयोग तथा सरकार काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित होत आहे. (BMC)
शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक आयोगाने सुट्टी जाहीर केल्यानंतरही महापालिकेने मंगळवारी याबाबतच्या सुट्टीचे परिपत्रक जारी न केल्याने सुट्टी किंवा सवलत न मिळाल्याने अनेक महापालिका कर्मचाऱ्यांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता आला नाही. तसेच सुट्टी नसल्याने बहुतांशी कर्मचाऱ्यांनी मतदानासाठी न जाण्याचा निर्धार केला, याचा परिणाम मतदानावर झाला आहे. (BMC)
(हेही वाचा – Delhi Court: अरविंद केजरीवाल यांना ३ दिवसांची सीबीआय कोठडी)
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी सायंकाळी जारी केले, त्यात त्यांनी असे नमुद केले आहे की, भारत निवडणूक आयोगाच्णा २४.०५.२०२४ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये कोकण विभाग व मुंबई या पदवीधर तसेच नाशिक विभाग व मुंबई शिक्षक मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. निवडणुकीचे मतदान बुधवारी २६ जून २०२४ (बुधवार) रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत व मतमोजणी सोमवारी ०१ जूलै २०२४ रोजी होणार आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५-बी नुसार लोकसभा तथा विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी कर्मचा-यांना भरपगारी रजा देणाची तरतूद आहे. मात्र, विधानपरिषद शिक्षक/पदवीधर मतदार संघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्याने, त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या २३.०६.२०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये पदवीधर शिक्षक निवडणूकामध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्तिक रजा जाहीर केलेली आहे. ही रजा त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे. (BMC)
त्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेतील (BMC) संबंधित मतदार कर्मचारी यांना २६.०६.२०२४ रोजी अर्ध्या दिवसाची (सकाळी/दुपारी) विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात येत आहे, अशाप्रकारचे अर्ध सुट्टीचे परिपत्रक महापालिका सामान्य प्रशासन विभागाने संध्याकाळी पाच वाजता प्रसिध्द केले. मात्र, मतदानाची वेळ सायंकाळी सहाची असल्याने सायंकाळी साडेपाच पर्यंत जारी झालेल्या या परिपत्रकाचा लाभ मतदार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना घेता आलेला नाही. त्यामुळे हे परिपत्रक केवळ आयोगाला दाखवण्यासाठीच काढले का असा संतप्त सवाल कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community