वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात उत्तरप्रदेश येथील काशी विश्वेश्वर मंदिराच्या मुक्तीसाठी कायदेशीर लढा देणारे अधिवक्ते आणि याचिकाकर्ते यांचा हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारताचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. (Vaishwik Hindu Rashtra Mahotsav)
(हेही वाचा – Pandharpur: श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन ‘या’ तारखेपासून सुरू होणार, जाणून घ्या)
श्रीराम मंदिरानंतर उत्तरप्रदेश येथील श्री काशी विश्वेश्वर मंदिर म्हणजे हिंदु धर्मियांचे सर्वात मोठे श्रद्धास्थान आहे. या संदर्भात मंदिर मुक्तीसाठी मागील ४० वर्षे संघर्ष करणारे सोहन लाल आर्य, कायदेशीर लढा देणारे अधिवक्ता सुभाष नंदन चतुर्वेदी, अधिवक्ता मदन मोहन यादव, अधिवक्ता दीपक कुमार सिंग, यांसह माता शृंगारगौरीच्या पूजेच्या अधिकारासाठी याचिका करणार्या सीता साहू आणि त्यांना पाठींबा देणारे त्यांचे यजमान बाल गोपाल साहू, याचिकाकर्त्या मंजू व्यास या सर्वांचा वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनात सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित धर्मप्रेमींनी ‘बाबा विश्वनाथकी जय’, ‘नम: पावर्तीपते हर हर महादेव’ या घोषणा दिल्या. (Vaishwik Hindu Rashtra Mahotsav)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community