T20 World Cup, Ind vs Eng : भारत, इंग्लंड उपांत्य सामन्यावर पावसाचं जोरदार सावट 

T20 World Cup, Ind vs Eng : दुसऱ्या उपांत्य सामन्याला राखीव दिवस नाही

135
T20 World Cup, Ind vs Eng : भारत, इंग्लंड उपांत्य सामन्यावर पावसाचं जोरदार सावट 
T20 World Cup, Ind vs Eng : भारत, इंग्लंड उपांत्य सामन्यावर पावसाचं जोरदार सावट 
  • ऋजुता लुकतुके

सुपर ८ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (T20 World Cup, Ind vs Eng) दरम्यानचा सामना भारताने जिंकला तेव्हा १९ नोव्हेंबर २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदला म्हणून चाहत्यांनी विजयाचं स्वागत केलं. एकतर भारतीय संघ जिंकला होता. दुसरं म्हणजे ऑस्ट्रेलियन संघाला (Australian teams,) त्या पराभवामुळेच स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. आता इंग्लंड विरुद्धचा उपांत्य सामना ही भारतीय संघासाठी आणखी एका पराभवाचा वचपा काढण्याची संधी असेल. २०१९ च्या टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा पराभव केला होता. त्याबरोबरच २००७ नंतर दुसरा टी-२० विश्वचषक जिंकण्याची भारताची संधी गेली. हा पराभवही भारतीयांच्या जिव्हारी लागणाराच होता. (T20 World Cup, Ind vs Eng)

(हेही वाचा- Vision Panorama 2024 : नेत्र तज्ञांची ‘व्हिजन पॅनोरमा 2024’ परिषद संपन्न, राज्यभरातून १३० नेत्रतज्ज्ञांचा सहभाग)

आता योगायोग असा आहे की, भारत आणि इंग्लंड पुन्हा एकदा विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेऱीत आमने सामने येत आहेत. पण, यावेळी एक तिसरा संघही भाग घेणार आहे. तो आहे पाऊस, गयानामध्ये सध्या मुसळधार पाऊस होतोय. सामन्याच्या दिवशीही पावसाची शक्यता आहेच. बुधवारचं तिथलं हवामान म्हणजे १२ तास सलग पाऊस पडलाय. आकाश कायम अभ्राच्छादित राहिलं आहे. हवेतील आर्द्रताही ९१ टक्के आहे. (T20 World Cup, Ind vs Eng)

हा सामना स्थानिक वेळी सकाळी साडेदहा वाजता सुरू होणार आहे. ॲक्युवेदर वेबसाईटच्या अंदाजानुसार, सकाळी इथं पावसाची शक्यता ९१ टक्के आहे. तर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता १८ टक्के आहे. महत्त्वाचं म्हणजे त्रिनिदाद मधील पहिल्या उपान्त्य सामन्यासारखा या सामन्यासाठी राखीव दिवस नाही. पण, पावसामुळे सामना लांबल्या, २५० मिनिटांची अतिरिक्त वेळ राखून ठेवण्यात आली आहे. (T20 World Cup, Ind vs Eng)

(हेही वाचा- CBSE : इयत्ता दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर)

पावसामुळे सामन्याचा निकाल लागू शकला नाही किंवा अख्खा दिवस वाया गेला तर भारतीय संघाला अंतिम फेरीत पुढेचाल मिळेल. स्पर्धेचा तसा नियम आहे. सुपर ८ गटात अव्वल राहिलेला संघ पुढे जाईल असं नियम सांगतो. पहिल्या गटात भारतीय संघ अव्वल होता. तर इंग्लिश संघ दुसऱ्या गटात दुसऱ्या स्थानावर होता. भारतीय संघाला या नियमाचा फायदा मिळू शकेल. (T20 World Cup, Ind vs Eng)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.