- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाला सुपर ८ चा ऑस्ट्रेलिया विरुद्घचा सामना आणि उपांत्य फेरीची लढत यामध्ये फारशी विश्रांती मिळालेली नाही. शुक्रवारी सकाळी होणाऱ्या सामन्यासाठी गुरुवारी दुपारी भारतीय संघ गयानाला पोहोचला. पण, तरीही खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असल्याचं समाधान होतं. शेवटच्या दोन सामन्यांत संघाने निर्विवाद विजय मिळवला आहे. आणि आता भारतीय संघ उपांत्य लढतीसाठी सज्ज झाला आहे. (T20 World Cup, Ind vs Eng)
(हेही वाचा- T20 World Cup, SA in Final : अफगाणिस्तानचा ९ गडी आणि ६७ चेंडू राखून धुव्वा उडवत दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत )
भारतीय संघ या सामन्यासाठी गयाना इथं पोहोचला तेव्हाचा एक व्हीडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. यात प्रामुख्याने रोहित शर्मा (Rohit Sharma), अक्षर पटेल (Akshar Patel) आणि इतर भारतीय संघ दिसत आहे. इथं भारतीय संघाचं स्वागत शेकडो चाहत्यांनी केलं. खेळाडूंबरोबर फोटो आणि त्यांच्या स्वाक्षरींसाठी त्यांची गर्दी जमली होती. (T20 World Cup, Ind vs Eng)
St. Lucia ✅#TeamIndia have reached Guyana ✈️ for the Semi-final clash against England! 👍 👍#T20WorldCup | #INDvENG pic.twitter.com/p4wqfZ4XUw
— BCCI (@BCCI) June 26, 2024
भारतीय संघाने आतापर्यंत या स्पर्धेत चोख कामगिरी बजावली आहे. सलामीवीर विराट कोहलीचा (Virat Kohli) फॉर्म ही चिंता सोडली तर भारतासाठी फारसं काही चुकलेलं नाही. जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि अर्शदीप (Arshdeep) गोलंदाजीत चांगली कामगिरी करत आहेत. तर फलंदाजीतही रोहित शर्मा (Rohit Sharma), शिवम दुबे (Shivam Dube), सूर्यकुमार (Suryakumar) आणि हार्दिक (Hardik) यांच्यावर भारताची भिस्त असेल. शेवटच्या दोन सामन्यांत फलंदाजांनी एकदा १९४ आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध तर २०५ अशी धावसंख्या रचली. आताही खेळपट्टीकडून गोलंदाजांनाच साथ मिळेल. आणि तसं झालं तर बुमरा, कुलदीप आणि इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर (Jofra Archer) यांची षटकं निर्णायक ठरतील, अशी शक्यता आहे. इंग्लिश संघही एकाचवेळी गयानाला पोहोचला आहे. (T20 World Cup, Ind vs Eng)
Definitely England in the semi-finals ✈️
🔜 Guyana #EnglandCricket | #ENGvIND pic.twitter.com/mMELo4t92Q
— England Cricket (@englandcricket) June 25, 2024
दोन संघ १९ महिन्यांपूर्वी इंग्लंड विरुद्ध टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतच एकमेकांना भिडले होते. पण, जोस बटलर (Jos Buttler) आणि ॲलेक्स हेल्स (Alex Hales) यांनी इंग्लंडला १० गडी राखून विजय मिळवून दिला होता. भारतीय संघ हा पराभव अजून विसरलेला नाही. पण, पावसामुळे हा सामना होण्याची शक्यताही कमी आहे. सामना झाला नाही तर गटात अव्वल स्थानावर असल्यामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल. (T20 World Cup, Ind vs Eng)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community