अंतराळात अडकलेल्या सुनीता विलियम्स (sunita williams) यांच्या पृथ्वीवर परतण्याच्या दिवसाची प्रतीक्षा दिवसागणिक आणखी लांबत असून, आता अवकाशात त्यांच्यापुढं आलेल्या या अडचणी नेमक्या कधी संपणार हाच चिंतातूर करणारा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. याच चिंतेमध्ये एक आशेचा किरण दिसल्यामुळं सध्या सुनीला विलियम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांना माघारी आणण्यासाठीच्या हालचालींना वेग येणार आहे. (Elon Musk)
नासाच्या बोईन स्टारलायनरच्या प्रवासात अडचणी
जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून गणल्या जाणाऱ्या एलॉन मस्क (Elon Musk) यांची स्पेस एक्स (space x) ही संस्था NASA ला या संकटात मोठी मदत करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीपासूनच नासाच्या बोईन स्टारलायनरच्या प्रवासात अडचणी आल्याचं पाहायला मिळालं, ज्यामुळं त्याचं उड्डाणही टाळण्यात आलं होतं. पुढं 6 जूनरोजी Boeing Starliner अंतराळात असणाऱ्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचलं. पण, आता मात्र ते परतण्याच्या शक्यता आणि प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहेत. हेलियम गळतीमुळं बोईंगच्या परतीच्या प्रवासात अडचणी निर्माण होत असल्याची प्राथमिक माहिती नासाकडून देण्यात आली आहे. (Elon Musk)
एलॉन मस्क यांची स्पेस एक्स तारणहार ठरणार
येत्या काळात अंतराळात अडकलेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी एक नवं यान पाठवलं जाणार असून, या मोहिमेमध्ये एलॉन मस्क यांची स्पेस एक्स तारणहार ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. न्यूयॉर्क युनिवर्सिटीतील एयरोस्पेस इंजिनियरिंगचे प्राध्यापक कात्सुओ कुराबायशी यांच्या माहितीनुसार स्टारलायनरची सद्यस्थिती पाहता नासाच्या अंतराळवीरांना सुरखरुप परत आणण्यासाठी स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगनसारख्या अंतराळयानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. (Elon Musk)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community