- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषक संपल्या संपल्या भारतीय संघ झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. यात संघ ५ टी-२० सामने खेळणार आहे. सुरुवातीला बीसीसीआय आणि निवड समितीने विश्वचषक खेळलेल्या खेळाडूंना विश्रांती देण्याचं ठरवलं होतं. पण, आता निवड झालेला एक खेळाडू नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) जायबंदी असल्यामुळे त्याच्या जागी शिवम दुबेची (Shivam Dube) निवड केली आहे.
(हेही वाचा- CM Eknath Shinde : ठाणे, मीरा-भाईंदरमधील अनधिकृत पब, बार आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा)
६ जुलैला झिम्बाब्वेत पहिला टी-२० सामना खेळवला जाणार आहे. बीसीसीआयचा (BCCI) वैद्यकीय चमू सध्या नितिश कुमारची तब्येत आणि उपचारांवर लक्ष ठेवून आहे. या दौऱ्यासाठी निवड समितीने रियान पराग (Rian Parag), अभिषेक शर्मा (Abhishek Sharma), तुषार देशपांडे (tushar Deshpande) तसंच नितीश रेड्डीला संधी दिली होती. पैकी नितीशची संधी दुखापतीमुळे हुकलीय. शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली हा संघ मालिकेत खेळणार आहे. (Shivam Dube)
‘निवड समितीने दुखापतग्रस्त नितीश कुमारच्या (Nitish Kumar Reddy) ऐवजी शिवम दुबेची (Shivam Dube) निवड झिम्बाब्वे दौऱ्यासाठी केली आहे,’ असं बीसीसीआयने अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) या ज्येष्ठ खेळाडूंना या दौऱ्यासाठी विश्रांती दिली आहे. यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन, आवेश खान, खलिल अहमद या टी-२० विश्वचषकासाठी संघात असलेल्या पण, तिथे संधी न मिळालेल्या खेळाडूंचा समावेश संघात करण्यात आला आहे. (Shivam Dube)
(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs Eng : भारतीय संघ उपांत्य सामन्यासाठी गयानामध्ये पोहोचला तो क्षण…)
झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणारा भारतीय संघ पुढीलप्रमाणे,
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, रियान पराग, अभिषेक शर्मा, शिवम दुबे (Shivam Dube), रिंकू सिंग, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलिल अहमद, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल व तुषार देशपांडे
हेही पहा-
Join Our WhatsApp Community