Sanjay Raut: मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी राऊतांनी रेटले उद्धव ठाकरेंचे नाव; मविआत आतापासूनच शीतयुद्ध!

176
Sanjay Raut: मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी राऊतांनी रेटले उद्धव ठाकरेंचे नाव; मविआत आतापासूनच शीतयुद्ध!
Sanjay Raut: मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी राऊतांनी रेटले उद्धव ठाकरेंचे नाव; मविआत आतापासूनच शीतयुद्ध!

उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुन रान पेटवले आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा न जाहीर करता, महाविकास आघाडीने मतदारांकडे मत मागू नये, अशी आग्रही भूमिका राऊतांनी घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut)

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव रेटले आहे. बिन चेहऱ्याने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मतदान मागणे हे धोक्याचे असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणार हा धोका आहे. या महाराष्ट्र आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचे काम पाहिले आहे. लोकसभेला पण त्यांच्या चेहऱ्यामुळे मतदान झाल्याचा दावा राऊतांनी माध्यमांसमोर बोलताना केला. त्यानंतर महाविकास आघाडीत आतापासूनच मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावरुन शीतयुद्ध सुरु असल्याचे दिसून आले.

“मुख्यमंत्री पदासाठी आताच आघाडीतील कुठल्याही नेत्यांनी स्वारस्य दाखवू नये”

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पण त्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री पदासाठी आताच महाविकास आघाडीतील कुठल्याही नेत्यांनी स्वारस्य दाखवू नये. आम्ही सत्तेवर पाहिजे हे स्वारस्य असले पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. निवडून आलेले आमदार त्यावेळी मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतली. त्यावर आताच भाष्य करणे टाळले पाहिजे अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या विधानावर महायुतीचे नेते संजय शिरसाट यांनी चांगलाच चिमटा काढला. उद्धव ठाकरे यांना राऊतांनी पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केल्याची आठवण त्यांनी करुन दिली. पक्षाचा नेता म्हणून त्यांनी केलेली मागणी हे त्याच्यापूरती सीमित आहे. शरद पवार असतील किंवा इतर काँग्रेसचे नेते असतील हे कधी मान्य करतील असं मला वाटत नाही. त्यामुळे राऊत हे काडी लावत असल्याचा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसचा लोकसभेतील स्ट्राईक रेट चांगला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर शरद पवार यांची राष्ट्रवादी असल्याचे शिरसाट म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.