Paris Olympic 2024 : पॅरिससाठी पात्र ठरलेले ५ मुष्टीयोद्धे सरावासाठी निघाले जर्मनीला

Paris Olympic 2024 : या पाच मुष्टीयोद्धांचा मुक्काम पुढील दीड महिना जर्मनीत सारब्रुकेन इथं असेल 

139
Paris Olympic 2024 : पॅरिससाठी पात्र ठरलेले ५ मुष्टीयोद्धे सरावासाठी निघाले जर्मनीला
Paris Olympic 2024 : पॅरिससाठी पात्र ठरलेले ५ मुष्टीयोद्धे सरावासाठी निघाले जर्मनीला
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकसाठी (Paris Olympic 2024) ६ मुष्टीयोध्दे पात्र ठरले आहेत. यातील अमित पनघल (Amit Panghal) हा पुरुषांच्या गटात खेळणार आहे. इतर पाच महिला मुष्टीयोद्धे ऑलिम्पिक पूर्वीच्या तयारीसाठी दीड महिना जर्मनीला राहणार आहेत. तिथल्या सारब्रुकेनच्या ऑलिम्पिक केंद्रात त्या सराव करतील. २८ जूनपासून त्यांचा हा दौरा सुरू होणार आहे. ५० किलो वजनी गटातील विश्वविजेती निखत झरिन (Nikhat Zareen), टोकयो ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकलेली लवलिना बोर्गोहेन (Lavalina Borgohen) (७५ किलो वजनी गट) या दोघी जर्मनीत सराव करणार आहेत. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- महाविकास आघाडी तुटेल पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर येणार नाही; Sanjay Shirsat यांची टीका)

तर त्यांच्या बरोबर निशांत देव (Nishant Dev), प्रीती पवार (Preeti Pawar) आणि जस्मिन लॅम्बोरियाही (Jasmine Lamboria) असतील. सारब्रुकेन इथं सध्या अमेरिका, मंगोलिया, जर्मनी, आयर्लंड आणि डेन्मार्कचे मुष्टीयोद्धेही सराव करत आहेत. भारतीय मुष्टीयोद्ध्यांना त्यामुळे स्पर्धेचा चांगला सरावही मिळेल अशी अपेक्षा आहे. तसंच जर्मनी हे पॅरिसच्या तुलनेनं जवळ असल्यामुळे युरोपातील वातावरण आणि हवेशी जुळवून घेताना खेळाडूंना त्रास पडणार नाही, हे आणखी एक कारण, या खेळाडूंना जर्मनीत पाठवण्यामागे आहे. (Paris Olympic 2024)

दरम्यान अमित पनघल साई केंद्राच्या शिलारू इथं असलेल्या बॉक्सिंग रिंगमध्ये सराव करणार आहे. त्याचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ त्याच्याबरोबर तिथं आहेत. बाकीच्या मुष्टीयोद्ध्यांमध्ये तो थेट पॅरिसमध्येच सामील होईल. भारतीय खेळाडूंचं जर्मनीतील शिबीर २२ जुलै पर्यंत चालेल. त्यानंतर खेळाडू पॅरिसला रवाना होतील. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : पॅरिससाठीच्या ऑलिम्पिक संघात ५ नवोदित चेहरे)

२००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये विजेंदर कुमारने पहिल्यांदा कांस्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर रिओ ऑलिम्पिकचा अपवाद वगळता पुढील प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये भारताने किमान एकतरी पदक मुष्टीयुद्धात जिंकलं आहे. २०१२ मध्ये मेरी कोम तर २०२० च्या टोकयोमध्ये लवलिना बोरगोहेनने कांस्य जिंकलं होतं. (Paris Olympic 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.