- ऋजुता लुकतुके
बंगळुरूमध्ये झोमटो कंपनीच्या डिलिव्हरी एजंटने एक पार्सल घरपोच देताना दुसऱ्या एका घरासमोरचं पार्सल आपल्या खिशात घातल्याची धटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. स्थानिक पत्रकार आदित्य कालरा यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Zomato Agent a Thief ?)
‘आम्ही सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने झोमॅटो डिलिव्हरी एजंटची चोरी पकडली आहे. एका घरात ऑर्डर पोहोचवताना या एजंटला एका घराबाहेर दुसरी एक ऑर्डर पडून असल्याचं दिसलं. एजंटने इकडे तिकडे कुणी नाही ना हे पाहिलं आणि चक्क ती ऑर्डर उचलून तो पसार झाला. ही घटना खूपच भयंकर आणि धक्कादायक आहे,’ असं आदित्य यांना ट्विटरवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे. (Zomato Agent a Thief ?)
We caught @Zomato delivery theft on our CCTV camera in Bangalore. He delivers the order, spots our other food package at the door, quietly picks it up and goes away. Shocking indeed. pic.twitter.com/oyeNebAdir
— Aditya Kalra (@adityakalra) June 25, 2024
(हेही वाचा – Paris Olympic 2024 : पॅरिससाठीच्या ऑलिम्पिक संघात ५ नवोदित चेहरे)
ट्विटर संदेशात झोमॅटोला टॅग केलेलं असल्यामुळे झोमॅटोनंही या व्हिडिओला त्वरित उत्तर दिलं आहे. ‘प्रिय आदित्य, झाल्या प्रकाराबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि इथं हे ही नमूद करू इच्छितो की, अशा घटना, चुका आम्ही गांभीर्याने घेतो. तुम्ही आम्हाला ऑर्डरची वेळ आणि इतर माहिती थेट संदेशाच्या माध्यमातून पाठवा. आम्ही यावर लगेचच कारवाई करू.’ (Zomato Agent a Thief ?)
पहिल्या टविटनंतर काही मिनिटांतच झोमॅटो कंपनीने हे ट्विट केलं आहे. पण, त्यानंतरही लोकांनी आपले अनुभव सांगणारे संदेश लिहिले आहेत. एक ग्राहक म्हणतो, ‘कंपनी कारवाई करेलही. पण, असे प्रकार काही नवीन नाहीत.’ (Zomato Agent a Thief ?)
या प्रकरणामुळे झोमॅटो, स्विगी, ॲमेझॉन सारख्या घरपोच अन्न पदार्थ आणि वस्तू पोहोचवणाऱ्या कंपन्यांच्या एजंटवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. काहीच महिन्यांपूर्वी एका स्विगी एजंटने दिल्ली जवळ गुरुग्राम इथं एका घराबाहेरून नाईकी कंपनीने बूट चोरले होते. तर २०१९ मध्ये पुण्यातील एका महिलेनं तिचा पाळीव कुत्रा अशाच एका एजंटने चोरल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. काही वेळा फूड डिलिव्हरी एजंट ऑर्डरमधील अन्न खातानाही दिसले आहेत. एजंटना मिळणारा अत्यल्प मोबदला हे ही त्याचं एक कारण आहे. पण, त्यामुळे चोरीचं समर्थन होऊ शकत नाही. (Zomato Agent a Thief ?)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community