- ऋजुता लुकतुके
गुगलने यंदा ‘मेड बाय गुगल’ हा आपला वार्षिक कार्यक्रम नेहमीपेक्षा थोडा लवकर घेण्याचं ठरवलं आहे. एरवी ऑक्टोबर महिन्यात होणारा हा कार्यक्रम यंदा १३ ऑगस्टला घेण्याचा कंपनीचा मानस आहे. त्यांनी तशी जाहिरातही केली आहे. पण, त्यामुळे कंपनीला काही दमदार नवीन उत्पादनं बाजारात आणायची आहेत, असाच तज्जांचा अंदाज आहे. पिक्सेल ९ स्मार्ट फोन, पिक्सेल वॉच ३ यांची चर्चाही सुरू झाली आहे. (Made by Google Event Announced)
यंदा गुगलने या कार्यक्रमाच्या ठिकाणातही बदल केला आहे. एरवी न्यूयॉर्कमध्ये कंपनीचा हा वार्षिक कार्यक्रम होतो. यंदा तो गुगलच्या कॅलिफोर्नियातील माऊंटन व्ह्यू या मुख्यालयात होणार आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री साडे दहा वाजता भारतात लोकांना लाईव्ह स्ट्रीम द्वारे कार्यक्रम पाहता येणार आहे. (Made by Google Event Announced)
Made by Google is coming August 13 — and we’ll be showcasing the latest #Pixel devices, the best of Google AI and @Android software updates. Sign up for updates → https://t.co/W5MELxS9fK pic.twitter.com/AHvF2iIXXV
— Google (@Google) June 25, 2024
(हेही वाचा – Maharashtra VidhanSabha session: विधानसभेत ८ आमदारांचे राजीनामे मंजूर; ‘ते’ आमदार कोण?)
कंपनीने फोनला ठेवले ‘हे’ नाव
नाईन टू फाईव्ह गुगल या वेबसाईने दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात कंपनी गुगल एआय, अँड्रॉईड सॉफ्टवेअर तसंच पिक्सेल पोर्टफोलिओ यांवर लक्ष केंद्रीत करेल. त्यामुळेच पिक्सेल ९ सीरिज हा स्मार्टफोन लाँच होण्याची दाट शक्यता आहे. ग्राहकांना उत्सुकता आहे ती पिक्सेल ९ प्रो या फोनची. आधीच या फोनबद्दलचा एक छोटा व्हिडिओ प्रसिद्ध करून या फोनबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. या फोनला कंपनीने जादू म्हटलं आहे. (Made by Google Event Announced)
पिक्सेल फोनबरोबरच कंपनी पिक्सेल वॉचची तिसरी पिढी दोन आकारांमध्ये आणि पिक्सेल बड्स प्रो ही आणखी काही उत्पादनं बाजारात आणू शकते. सॉफ्टवेअरच्या आघाडीवर कंपनी अँड्रॉईड १५ ही प्रणाली, फोन आणि अँड्रॉईडसाठी योग्य एआय प्रोग्राम तसंच एआय मध्येच आणखी काही कल्पना लाँच करू शकते. (Made by Google Event Announced)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community