पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) जुलै महिन्यात २ दिवसीय रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते ८ आणि ९ जुलैला रशियाला भेट देणार आहेत. यावेळी ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय शिखर बैठक घेणार आहेत. या बैठकीत तेल, द्विपक्षीय संबंध, युक्रेन- रशिया युद्ध यासोबत अनेक मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते.
तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच रशिया दौरा असेल. याआधी पंतप्रधान मोदी हे २०१९ मध्ये रशिया दौऱ्यावर गेले होते. जेव्हा ते २०व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी व्लादिवोस्तोक येथे गेले होते.
(हेही वाचा – ओवैसींची खासदारकी रद्द करा, Navneet Rana यांनी राष्ट्रपती मुर्मूंना पत्र पाठवून केली मागणी)
या दौऱ्याबद्दल माहिती देताना रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे सहाय्यक युरी उशाकोव्ह म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या रशिया दौऱ्याची तयारी सुरू आहे. आम्ही अद्याप तारीख सांगू शकत नाही. भारतानेही याला दुजोरा दिलेला नाही.
जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण…
भारत आणि रशियादरम्यान वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषद २००० मध्ये सुरू झाली. त्याच धर्तीवर पंतप्रधान मोदी रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. आतापर्यंत भारत आणि रशियामध्ये २१ वार्षिक शिखर परिषदा आळीपाळीने झाल्या आहेत. २१वी शिखर परिषद डिसेंबर २०२१ मध्ये नवी दिल्ली येथे झाली. तेव्हापासून द्विपक्षीय सहकार्यावरील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी मोदी आणि पुतिन यांनी किमान १० वेळा फोनवरून संवाद साधला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community