सल्ला देऊ नका, चला बसा; सभापती Om Birla यांनी कुणाला फटकारलं?

सभापती Om Birla म्हणाले, "कशावर आक्षेप असावा आणि कशावर नसावा, सल्ला देत जाऊ नका. चला बसा."

246
सल्ला देऊ नका, चला बसा; सभापती Om Birla यांनी कुणाला फटकारलं?
सल्ला देऊ नका, चला बसा; सभापती Om Birla यांनी कुणाला फटकारलं?

लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचे पहिले अधिवेशन सुरु आहे. या पहिल्या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सभापती ओम बिर्ला (Om Birla) यांनी काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंग हुड्डा (Deepender Singh Hooda) यांना फटकारले. संसदेच्या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी केरळच्या तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय संविधान’ अशी घोषणा दिली.

(हेही वाचा – ओवैसींची खासदारकी रद्द करा, Navneet Rana यांनी राष्ट्रपती मुर्मूंना पत्र पाठवून केली मागणी)

यानंतर थरूर सभापती ओम बिर्ला यांच्यासोबत हस्तांदोलन करून आपल्या जागेवर परतत होते. तेवढ्यात सभापतींनी त्यांना हटकले आणि म्हणाले, संविधानाची शपथ तर घेतच आहात, ही संविधानाचीच शपथ आहे.

हुड्डा यांना फटकारले

सभापतींच्या या वक्तव्यावर काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा (Deepender Singh Hooda) यांनी टिपणी केली. हुड्डा म्हणाले, यावर आपण आक्षेप घ्यायला नको होता सर… यावर सभापती ओम बिरला यांनी हुड्डा यांना फटकारले. सभापती म्हणाले, “कशावर आक्षेप असावा आणि कशावर नसावा, सल्ला देत जाऊ नका. चला बसा.”

यावर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनीही आक्षेप घेत X वर पोस्ट केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.