पदपथांवरील अतिक्रमणे, अनधिकृत फेरीवाले यामुळे सर्व सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निरीक्षण माननीय उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. अतिक्रमण निर्मुलन करताना अधिक परिणामकारकता आणि सातत्य ठेवावे लागणार आहे. केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीच्या कालावधीत तसेच शनिवार व रविवारही नियमितपणे कारवाई केली पाहिजे, अशाप्रकारचे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह सहआयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांना दिले आहेत. (BMC)
मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईविषयी आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका प्रशासन आणि मुंबई पोलीस यांची संयुक्त बैठक गुरुवारी २७ जून २०२४ रोजी महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, सहआयुक्त (दक्षता) डॉ. गंगाथरण डी, पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे, अप्पर पोलीस आयुक्त (मुंबई पूर्व विभाग) डॉ. महेश पाटील, उप आयुक्त अभिनव देशमुख यांच्यासह महानगरपालिकेचे सह आयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त (विशेष) किरण दिघावकर यांच्यासह परिमंडळ उप आयुक्त, पोलीस उप आयुक्त, सहायक आयुक्त आदी उपस्थित होते. (BMC)
(हेही वाचा – State Legislature Monsoon Session : दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची घसरण; गुजरातने महाराष्ट्राला टाकले मागे)
माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यांवर कठोर करावी. अनधिकृत फेरीवालेमुक्त मुंबई करावी, जेणेकरून मुंबईकर नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल. पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे करावेत, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी गुरुवारी २७ जून २०२४ रोजी दिले आहेत. महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण निर्मुलन कारवाई केली जाणार असून या मोहिमेस मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त गगराणी यांनी केले आहे. (BMC)
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले की, गर्दी, वर्दळीची ठिकाणे निश्चित करून सातत्याने कारवाई झाली पाहिजे. त्यात कोणताही भेदाभेद खपवून घेतला जावू नये,असेही निर्देश दिले आहेत. वारंवार कारवाई करूनही जर कोणी जुमानत नसेल तर त्यांचा वीजपुरवठा, पाणीपुरवठा खंडीत करा. परवाना असेल तर तो रद्द करा. या संपूर्ण कारवाईचे व्हिडीओ छायाचित्रण करा. परिमंडळ उप आयुक्त आणि पोलीस उप आयुक्त यांनी समन्वय ठेवून कारवाई करावी. सहायक आयुक्तांनी मनुष्यबळ पुरवावे, अशाप्रकारच्या सूचनाही त्यांनी केल्या. (BMC)
(हेही वाचा – ओवैसींची खासदारकी रद्द करा, Navneet Rana यांनी राष्ट्रपती मुर्मूंना पत्र पाठवून केली मागणी)
मुंबईत आढळून येणारी बेवारस व भंगार वाहने हटविण्याची कारवाई ही नियमाच्या अधीन राहून करावी, पदपथांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सातत्याने सुरू असते. मात्र, यापुढील काळात कारवाईला वेग देण्यात यावा, यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. अतिक्रमण निर्मुलन कारवाई करताना प्रभाग कार्यालयातील तसेच विविध खात्यांनी एकत्रितपणे व समन्वयाने मोहीम राबवावी, सहभागी सर्व संबंधित विभागांनी दररोज जी कारवाई केली त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करावा, असेही निर्देश गगराणी यांनी दिले. (BMC)
कांदळवनांवर बांधकामांचा राडारोड…
कांदळवनांवर बांधकामांचा राडारोडा टाकून भराव निर्माण केला जातो व त्याठिकाणी अनधिकृत वस्ती निर्माण होत असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेला प्राप्त झाल्या आहेत. महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस यांची भरारी पथके नेमून या घटनांना आळा घालावा असेही गगराणी यांनी यावेळी नमूद केले. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community