- ऋजुता लुकतुके
या टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना (T20 World Cup, Ind in Final) शनिवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार हे आता निश्चित झालं आहे. गुरुवारी मध्यारात्री पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव केला. सुपरर ८ च्या सर्व सामन्यात भारताने आपलं निर्विवाद वर्चस्व दाखवून दिलं आहे. तेच इंग्लंड विरुद्धही दिसलं. पावसामुळे सामना दोन – अडीच तास उशिरा सुरू झाला. या सामन्यासाठी राखीव दिवस नसला तरी साडे चार तास अतिरिक्त राखून ठेवण्यात आले होते. त्यामुळे सुरुवात उशिरा झाली तरी पूर्ण २० षटकांचा सामना होऊ शकला. (T20 World Cup, Ind in Final)
पावसामुळे मैदान ओलं होतं, तरीही भारताने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली. हा निर्णय निर्णायक ठरला. कारण, दमट खेळपट्टीची थोडीफार मदत गोलंदाजांना सुरुवातीला मिळाली. पण, त्याहीपेक्षा जास्त ती दुसऱ्या डावात ऊन पडल्यावर मिळाली. फिरकी प्रभवाी ठऱण्यात भारताला मदत झाली. (T20 World Cup, Ind in Final)
(हेही वाचा- Gold Earrings For Women : सोन्याचे कानातले खरेदी करत आहात ? ‘हे’ वाचा…)
भारताने पहिली फलंदाजी करताना ७ बाद १७१ धावा केल्या. यात रोहित शर्माने (Rohit Sharma) ३९ चेंडूंत ५७ तर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) ३५ चेंडूंत ४७ धावा केल्या. (T20 World Cup, Ind in Final)
2️⃣ Unbeaten teams 1️⃣ Trophy at stake
South Africa and India will face off in Barbados for the ultimate prize 🏆#T20WorldCup #SAvIND pic.twitter.com/j8DC9YFIbM
— ICC (@ICC) June 27, 2024
हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) २७, रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) १७ आणि अक्षर पटेलने (Akshar Patel) १० धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघ १७० ची धावसंख्या गाठू शकला. खेळपट्टी वळत असल्यामुळे ही धावसंख्या तेव्हाही पुरेशी वाटत होती. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने (Chris Jordan) ३७ धावा देत ३ बळी मिळवले. विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा ९ धावा करून बाद झाला. या स्पर्धेत त्याने ८ सामन्यांत फक्त ७५ धावा केल्या आहेत. (T20 World Cup, Ind in Final)
इंग्लंडचा डाव सुरू झाला तेव्हा जोस बटलरने सुरुवातीला झटपट २३ धावा केल्या होत्या. अर्शदीपचा (Arshdeep) त्याने चांगलाच समाचार घेतला होता. पण, चौथ्या षटकांत रोहितने (Rohit Sharma) अक्षरची फिरकी सुरू केली.आपल्या पहिल्याच चेंडूवर त्याने जोस बटलरला (Jos Buttler) पंतकडे झेल द्यायला भाग पाडलं. धावसंख्येत आणखी १० घावांची भर पडते तोच बुमराने (Bumrah) चेंडूंच्या वेगात चातुर्याने बदल करत फिल सॉल्टला ५ धावांत त्रिफळाचीत केलं. (T20 World Cup, Ind in Final)
पटेलने मोईन अली (Moeen Ali) आणि बेअरस्टोला (Bairstow) बाद करून इंग्लंडची अवस्था ४ बाद ४६ अशी केली. हॅरी ब्रूक (Harry Brook) मैदानात आला तेव्हाही इंग्लंडला आशा होत्या. पण, पुढील काम अक्षरचा साथीदार कुलदीपने (Kuldeep) केलं. हॅरी ब्रूक (Harry Brook), सॅम करन (Sam Karan) आणि ख्रिस जॉर्डनला (Chris Jordan) बाद केलं. सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकला. इंग्लंडचा अख्खा संघ १०३ धावांत बाद झाला. अक्षर पटेलला (Akshar Patel) सामनावीराचा पुरस्कार मिळाला. आता शनिवारी २९ तारखेला बार्बाडोस इथं भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) असा अंतिम सामना होईल. (T20 World Cup, Ind in Final)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community