विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी, (२८ जून) अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर आल्या असून, त्या डोळ्यासमोर ठेवून या अतिरिक्त अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस त्यांनी केल्या. या अर्थसंकल्पात सर्व घटकांना सामावून घेण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे.
अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक घोषणा
राज्य सरकारने आजच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. महिलांसाठी माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. तसेच २५ लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याची घोषणा केली आहे. १०,००० पिंक रिक्षा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही राबवण्यात येतील.
(हेही वाचा – जमीन घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री Hemant Soren यांना जामीन मंजूर )
महिलांना संधी उपलब्ध करून देणे…
स्री कुटुंबाचा आधार आहे. एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या महिलाही आपल्याला समाजात पाहायला मिळतात. या महिलांना संधी उपलब्ध करून देणे, ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणूनच आमच्या लेकी-बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करतो, असे ते अर्थसंकल्पात घोषणा करताना म्हणाले. सरकार दरवर्षी एका महिलेला १८ हजार रुपये देणार आहे. या योजनेचा राज्यातील २ कोटी महिलांना फायदा होणार आहे.
दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांचा निधी
ही एक व्यापक आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. महिलांचे स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत २१ ते ६० वर्षे वयाच्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येईल. यासाठी दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून करण्यात येईल.
अन्नपूर्णा योजना
‘मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजने’ची घोषणाही या अर्थसंकल्पात केली. या योजनेनुसार, महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेचा फायदा ५२ लाख कुटुंबियांना होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community