राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी २८ जून रोजी २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प मांडला आणि मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांना दिलासा देणारा एक निर्णय जाहीर केला. पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केला ज्यामुळे बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे ६५ पैसे व डिझेलचा दर अंदाजे २.०७ रुपये प्रति लिटर स्वस्त होईल. या निर्णयाची अंमलबजावणी १ जुलै, २०२४ पासून होणार आहे. तसेच या निर्णयामुळे राज्याचे २०० कोटी करातून मिळणारे उत्पन्न कमी होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. (Petrol, Diesel Tax)
(हेही वाचा – Budget 2024: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची अजित पवार यांच्याकडून घोषणा, काय आहेत फायदे ? जाणून घ्या…)
पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला तेव्हा हा दहावा अर्थसंकल्प सादर करत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळावा म्हणून राज्यभरात पेट्रोल व डिझेल वरील मुल्यवर्धित करात समानता आणण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील (Diesel) सध्याचा कर २४ टक्क्यांवरुन २१ टक्के करण्याचे प्रस्तावित करीत आहे. तसेच पेट्रोल (Petrol) वर सध्या २६ टक्के अधिक प्रति लिटर ५.१२ रुपये एवढा कर आहे, तो कमी करुन २५ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे करण्याचा प्रस्ताव आहे. या बदलामुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे पासष्ट पैसे व डिझेलचा दर अंदाजे दोन रुपये सात पैसे प्रति लिटर स्वस्त होईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. (Petrol, Diesel Tax)
“हा निवडणुकीचा नाही तर निर्धाराचा अर्थसंकल्प आहे. निधी कुठून आणायचा, याचा विचार करूनच योजना तयार करण्यात आल्या आहेत,” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Petrol, Diesel Tax)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community