Maharashtra Budget Session : कृषिपंपाचं थकित बिल माफ करणारा आणि महिला, तरुणांना प्राधान्य देणारा अर्थसंकल्प

Maharashtra Budget Session : राज्य अर्थसंकल्पात कोणत्या वर्गासाठी कुठल्या तरतुदी आहेत ते जाणून घेऊया.

114
State Budget : आगामी विधानसभेसाठी भाई-दादांना 'लाडकी बहीण' मदत करणार?
  • ऋजुता लुकतुके

राज्य सरकारच्या या अर्थसंकल्पावर आगामी निवडणुकीचा प्रभाव तर आहेच आणि त्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी विठ्ठलाच्या वारीचा मार्ग पकडला आहे. तुकारामांच्या अभंगाने त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात केली. त्यानंतर विठ्ठलाचा जयघोष केला आणि मग भाषणाचा पहिला मुद्दाही वारीचाच उचलला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार पायी वारी करणार आहेत. राहुल गांधी रुणे, देहू आळंदीचा दौरा करणार आहेत. आता सरकारनेही वारकऱ्यांसाठी भरघोस योजना आणल्या आहेत. अर्थसंकल्पीय घोषणा तिथूनच सुरू झाल्या. (Maharashtra Budget Session)

त्या खालोखाल या अंतरिम अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी सर्वाधिक भर दिला तो महिला, मुली, शेतकरी आणि युवांवर. नवीन योजना, आहेत त्या योजनांना मुदतवाढ तसंच निधीमध्ये वाढ या माध्यमातून जित पवार यांनी महिला व युवा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच योजनांना ‘मोदी की गॅरेंटी’ या तत्वानुसार अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हमी मतदारांना देण्याचा प्रयत्न केला आहे. या अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी पाहूया, (Maharashtra Budget Session)

(हेही वाचा – Maharashtra Budget 2024: राज्याच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळालं? वाचा सविस्तर…)

  • वारीचं नियोजन व नियमनासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना
  • दिंडीसाठी प्रत्येक वारकरी गटाला प्रत्येकी २०,००० रुपये देणार
  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये
  • जुलै २०२४ पासून योजनेची अंमलबजावणी
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरवर्षी ३ मोफत गॅस सिलिंडर
  • राज्यात १०हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील
  • नवीन रुग्नवाहिका खरेदी केल्या जातील
  • ⁠बचत गटाच्या निधीत १५ हजारांहून ३० हजार रुपयांची वाढ केली जाईल
  • यावर्षी २५ लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे
  • व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत दिली जाणार
  • सरकारी रुग्णालयांमध्ये स्तन व गर्भाशय तपासणीची सोय उपलब्ध करणार
  • संजय गांधी निराधार योजनेला १ हजारावरुन दीड हजार रुपयांच अनुदान मिळालं
  • ⁠शेती कृषीपंपाचे सर्व थकित बील माफ
  • खरीप हंगाम २०२३ साठी ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर
  • दुष्काळाच्या जलद पंचनाम्यांसाठी प्रत्येक तालुक्यात ई पंचनाम्यांची सोय
  • शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीक विमा योजनेचा विस्तार
  • कृषि क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर व्हावा यासाठी प्रोत्साहन देणार
  • ग्रामीण परिवर्तन योजनेअंतर्गत ७६८ प्रकल्पांना मंजुरी
  • तंत्रविकास योजनेअंतर्गत २.१४ लाख शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि उपकरणं घेण्यासाठी निधी
  • शेतमाल साठवण्यासाठी नवीन गोदामांची सोय, आहेत त्या गोदामांची डागडुजी
  • कापूर, सोयाबीन, तेलबियांचं उत्पादन वाढवण्यासाठी अर्थसहाय्य
  • कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती २ हेक्टर ५,००० रुपयांचं अर्थसहाय्य
  • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तरुण, तरुणींना वार्षिक १०,००० रुपयांचा भत्ता
  • ग्रामीण भागात ५११ कौशल्य विकास केंद्र
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यावर भर
  • अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
  • दुर्बल घटकांना पंजाबराव देशमुख निवास भत्ता लागू (Maharashtra Budget Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.