Maharashtra Budget 2024: “हा थापांचा नाही, तर मायबापांचा अर्थसंकल्प”; फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर

139
Maharashtra Budget 2024: “हा थापांचा नाही, तर मायबापांचा अर्थसंकल्प
Maharashtra Budget 2024: “हा थापांचा नाही, तर मायबापांचा अर्थसंकल्प"; फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर

राज्यात 2024 च्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session 2024) सुरूवात झाली आहे. यामध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 जून रोजी अंतरिम बजेट सादर करण्यात आले. तसेच या अर्थसंकल्पात अनेक योजनाची घोषणा करण्यात आली. यामध्ये महिला, शेतकरी, तरुणांसाठी समर्पित अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. यावरून माजी मुख्यमंत्री तथा उबाठा गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांनी हा “थापांचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली” होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले. (Maharashtra Budget 2024)

(हेही वाचा  – Vaishwik Hindu Rashtra Mahotsav : वक्फ बोर्डप्रमाणे ‘मंदिर बोर्ड’ स्थापन करा; अधिवक्ता विष्णु जैन यांची मागणी)

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

शेतकरी, महिला, युवा मागासवर्गीय अशा सर्व घटचकांना समर्पित असा हा अर्थसंकल्प आहे. उद्धव ठाकरे म्हणाले हा ‘थापांचा’ अर्थसंकल्प आहे. आम्ही म्हणतो की हा “थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प” आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देणारा निर्णय घेणारा, कापूस सोयाबीन उत्पादकांना मदत करणारा, महिलांसाठी योजना आणणारा, तरुणांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प (Budget 2024) आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Maharashtra Budget 2024)

(हेही वाचा – Maharashtra Budget 2024 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना; विद्यार्थ्यांना दरमहा मिळणार 10 हजार रुपयांचे विद्यावेतन)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आता विरोधीपक्ष बोलत होते. त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता त्यांचे चेहरे उतरलेले होते, केवळ टीका करत होते. हा अर्थसंकल्प महाराष्ट्रात इतिहास निर्माण करणार आहे. आम्ही जे जे कबूल केलं आहे ती प्रत्येक गोष्ट वेळेत पूर्ण करुन दाखवून देऊ. हा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे निवडणुकीचा नाही, असं सांगताना विरोधक आपल्याला काय बोलायचंय हे आधीच लिहून आणतात, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं. (Maharashtra Budget 2024)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.